पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४२ बृहद्योगवासिष्ठसार. सर्ग ५८-सर्वात्मबोध करणारी कचाची गाथा. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, याविषयी मी तुला कचाची गाथा सागतों, ता ऐक. मेरूवरील अति निजेन प्रदेशात रहाणारा देवगुरूचा पुत्र एकदा अभ्यासवशात् भात्म्यामध्ये स्थिर विश्राम पावला. तत्वज्ञानामृताने परिपूर्ण झालेली त्याची मति पचभूतमय व अनादर करण्यास योग्य असलेल्या दृश्यामध्ये रममाण झाली नाही. भात्मतत्त्वावाचून त्याला काही दिसेना. त्यामुळे अतिशय विरक्त झालेला तो भापल्याशीच गद्गद वाणीने म्हणाला " मी काय करूं? कोठे जाऊ ? काय घेऊ । व त्याग कशाचा करूं ? महा कल्पातील जलाप्रमाणे आत्म्याने सर्व विश्व भरून सोडले आहे. सुख, दुःख जीव, आकाश, आशा, इत्यादि सर्व आत्ममय आहे, हे मला कळले आहे. आत्म्याच्या योगाने माझे सर्व कष्ट नष्ट झाले आहेत. देहाच्या आत, बाहेर, खाली, वर, व चोहों बाजूस आत्माच भात्मा पसरला आहे. अनात्ममय असे काहीच नाही. सर्वत्र आत्मा स्थित आहे. सर्व आत्ममय आहे. मी आत्म्यामध्येच स्थित आहे. चेतन व अचेतन असे सर्व मीच अतर्यामी आहे. मी अपार आकाशालाही भरून सर्वत्र सन्मय होऊन राहिलो आहे. मी परिपूर्ण सुखसागर आहे." राघवा, अशी भावना करीत, वारवार घटेच्या नादाप्रमाणे उत्तरोत्तर क्षीण होत जाणारा प्रवणोच्चार करीत व मनात कोणत्याही आंतर-बाह्य वस्तचे चिंतन न करीत तो बृहस्थतीचा पुत्र कच निरहंकार, शुद्ध व प्राणविक्षेपशून्य होऊन परम शातीचा अनुभव घेत मेरुपर्वतावर तसाच दीर्घकाल राहिला ५८. सर्ग ५९-विषय अमार माहेन, ब्रह्मदेवाच्या संकापासून विश्वाची कल्पना, त्याची विधाति व शास्त्रोत्पत्ति. श्रीवसिष्ठ-रामा, या संसारात अन्न, पान, स्त्री इत्यादि विषयांच्या योगाने जिह्वा, उपस्थ इत्यादि इंद्रियाना तुम करण्यावाचून आणखीं शुभ काय आहे, याचा शास्त्रानुरूप विचार व निश्चय केल्यावर परम-पदारूढ झालेला महारमा भोगातील कशाची इच्छा करणार ! मोक्षाप्रमाणे काम हाही एक पुरुषार्थच आहे असे तू म्हणशील तर सागतो. जे असाधू तिर्यग्योनीतील पशूप्रमाणे मूढ होऊन, कपणांचे जणु सर्वस्वच व आदि, मध्य आणि भंत या तिन्ही काळी तुच्छ भशा भोगांनी सतुष्ट होतात