पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ५५ ६४१ दिसतो. तात्पर्य प्रात्मज्ञाच्या अतिशय उपयोगी असे या त्रिभुवनांत कांही नसते. मृगजळाला सूर्याची जरी अपेक्षा असली तरी सूर्याला जशी त्याची मुळीच गरज नसते त्याप्रमाणे तत्त्ववेत्त्याच्या चित्प्रकाशाच्या आधारानेच सिद्ध होणान्या जगाला तत्त्ववेत्त्याची अपेक्षा असते. पण पूर्ण आनंदामध्ये क्रीडा करणारा तत्त्वज्ञ त्याच्याकडे ढुंकूनही पहात नाही. जगाला आत्मवे. त्याच्या चित्प्रकाशाची कशी गरज असते तेंच आता सांगतों-सर्व कुल पर्वत हे विस्तीर्ण व निर्मल ब्रह्मसागराचे फेंस आहेत. चित्सूर्याच्या तीक्ष्ण प्रकाशामुळेच सर्व नद्या व समुद्ररूपी मृगजळ उद्भवते. सर्व सर्ग-पंक्ती ह्या आत्मतत्त्व महासागराच्या लाटा आहेत. शास्त्रदृष्टी या अनुत्तमपदरूपी मेघापासून होणाऱ्या दृष्टी आहेत. चंद्र, सूर्य व अग्नि हे दगड व काष्ठे यांच्याप्रमाणे जड असून इतर मळांच्या कणाप्रमाणेच चिज्ज्योतीने प्रका- शित होतात. संसाररूपी अरण्यात फिरणारे असुर, सुर व मानवरूपी पशू कामभोगरूपी गवत खात विहार करितात. पण रामा, एका प्रकारें वनांत संचार करणारे पशुही बरे! कारण ते स्वतंत्र तरी असतात. पण मानव, देव इत्यादि उच्च जीव देहपिंजन्यांत व्यक्त अभिमानाने बद्ध झाल्या- मुळे पारतंत्र्य-दुःख भोगीत असतात. धात्याने त्यांच्या बंधनाकरिता हे रक्त-मांसाचे पिंजरेच बनविले आहेत. चामड्याच्या सजीव बाहुल्या हेच वन-पशू असून विवेकशून्य बाळाच्या चित्त-विनोदाकरितां भोगभूमि- रूप नगरमार्गावर ब्रह्मदेवाने त्याची योजना केली आहे. पण महामति तत्त्ववेत्ता या सगळ्या गौडबंगालाकडे पाहून थोडासाही चंचल होत नाही. रामा, चंद्र व सूर्य ज्यातून संचार करितात तें आकाशछिद्र ज्याच्या अपे- क्षेने लहानशा भूछिद्रा एवढेही नाही अशा अति मोठ्या पदात जाऊन बसलेल्या भात्मज्ञाला आकाशाच्याही एका लहानशा कोपऱ्यांत रहाणाऱ्या एकाद्या पदार्थाची तृष्णा कशी होणार ! ब्रह्मादि लोकपालही त्याच्या स्वरूपभूत चित्प्रकाशानेच आपापल्या अधिकारावर नियत कृत्य करीत मारूढ होतात. त्यामुळे बा साधो, धन्य व अतिविरळ तत्वज्ञान जगाची व त्यांतील क्षुद्र भोगांची काही गरज नसते. राजहंसाठा इंद्र पक्ष्यांप्रमाणे शेवाळ आवडत नाही. त्याप्रमाणेच तसा विषय प्रिय पाठत नाहीत ५५.