पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहयोगवासिष्ठसार. सर्वजन बहिर्मुख असतात. इष्ट व अनिष्ट यांची प्रतीतीही त्यांना बाहेरच येते आणि त्यामुळे त्यांतील इष्टाची प्राप्ति व मनिष्टाचा परिहार कसा होणार या विवंचनेत ते पडतात. भाल्याकडे त्यांची दृष्टि जातच नाही. त्यांना आत्मचिंतन करावयास फुरसतच होत नाही. त्यांचे जेवढे म्हणून लौकिक व वैदिक कर्मारंभ होत असतात तेवढे सर्व केवल देहा- करिता असतात. मात्म्याकरिता त्यांतील एकही नसतो. पाताल, ब्रह्मलोक, स्वर्ग, पृथ्वीतल व अतरिक्ष-लोक यातील कोठेही जरी गेलें तरी चिदेकरस प्रमाला जाणणारे पुरुष अगदी थोडे आढळतात. हे ग्राह्य व हे त्याज्य अशा भावना ज्याच्या नाहीशा झाल्या आहेत तो ज्ञानी अति दुर्लभ होय. प्राणी एकाद्या भुवनाचा राजा होऊ दे की, त्रिभुवनाचा अधिपति होऊ दे. पण उत्तम पदाला जाणल्यावाचून त्याला नित्य व निरतिशय विश्रांति मिळणे शक्य नाही. जे महा मतिमान् संत इंद्रिय-शत्रूवर शौर्य गाजवू शकतात तेच, जन्मदु.खाच्या नाशाकरिता, इतरांस सेव्य होतात. पाताळ, भूलोक व स्वर्ग यातील कोठेही जाऊन जरी पाहिले तरी सर्वत्र पांच भूताचें मिश्रण दिसते. सहावें भूत अथवा पांच भूतावाचून अन्य काही दिसत नाही, मग मासक्त कोठे व्हावयाचे ! वेद, शास्त्र व आर्य यांनी सांगितले. स्या युक्तीने व्यवहार करणारास संसार, गायीच्या चिखलात रुतलेल्या व पाण्याने भरलेल्या पावलासारखा क्षुद्र होतो. पण जे युक्तीचा त्याग करितात त्यांना तोच अपरंपार व दुस्तर सागर भासतो. अमर्यादित आत्मानंदाच्या दृष्टीने पाहिल्यास ब्रांड लहानशा उंबराच्या फळा-एवढे दिसू लागते. मग त्यातले तो घेणार काय व टाकणार काय ! पण या असल्या क्षुद्र ब्रह्मांडातील एकाद्या क्षुद्रतर भागाकरिता लढून मरणान्या व असंख्य प्राण्यांचे बळी देणाऱ्या व घेणान्या राजांस काय म्हणावें, तेच समजत नाही. दयाळु तत्त्ववेत्त्यांच्या विकारास ते पात्र आहेत. तत्त्वज्ञ पुरुष महाप्रलयापर्यत रहा- णाऱ्या ब्राह्म पदावरही आसक्ति ठेवीत नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीने काही उत्पनच झालेले नसते. तेव्हा वांझेच्या मुलासारख्या या जगातील एकाचा मंशाचा लाम झाल्याने त्याच्या चिदात्म्यावर कोणता मोठा उपकार होणार आहे ! सार्वभौम पदाची तर त्याच्या विपुल हदयांत मुळीच दाद लागत नाही. कारण एकीकडून शेकडों पर्वतांनी व दुसरीकडून महा सागरांनी भरलेल्या या पृथ्वीत त्यांना सारभूत संशापेक्षा असार भागच फार