पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ५७. ६३९ देश केवल द्वार दाखविणारा आहे. त्यातून आत शिरून चित्तैकाम्याने मर्वातर्यामीचे दर्शन तुझें तुलाच स्वपौरुषाने घेतले पाहिजे. भसो; रामा, वासना-क्षय झाल्यावाचून कर्ता-अकर्ता, भोक्ता-अभोक्ता इत्यादि विचारही चागले ठसणार नाहीत. यास्तव तूं अगोदर वासना सोड. फार काय पण मोक्षच्छाही सोड. विषयाच्या सेवनाने चित्तात स्थिर झालेल्या व तिर्यग्योनि देणाऱ्या तामसी वासनाचा अगोदर त्याग करून मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा याची शुद्ध भावना धर. काही दिवसांनी ती भावना दृढ होईल. नतर बाहेरून मैत्र्यादिकांनी व्यवहार करीत अस- तानाही आतून मैत्र्यादिक चिन्मात्र'हून भिन्न नाहीत, असा विचार करून त्याचा त्याग करावा. सर्व इच्छा सोडाव्या व चिन्मात्रच मी आहे, अशी वासना दृढ करावी. नंतर चित्त व त्याच्या वृत्ती यासह तिचाही त्याग करावा आणि शेवटी सर्व त्याग केल्यावर ज्याचा त्याग करता येणे शक्य नाही, असा प्रत्यगात्मा अवशिष्ट राहिला असता, त्याच्याच स्वरूपात मिळून जाऊन स्थिर समाधाना(विश्राती)चा अनुभव घ्यावा आणि ते स्थिर झाले म्हणजे सवे द्वैतकल्पनाचे मूळ व ज्याच्या योगाने पूर्वोक्त सर्व सोडता आले त्या अहकाराचा त्याग कर. प्राणस्पदन कलना, काल, प्रकाश, अंधकार, वासना, वासनावान् , विषय, इंद्रियें, अहंकार इत्यादि सर्वाचे उन्मूलन करून ज्याची बुद्धि आकाशाप्रमाणे सौम्य, निर्मल, विक्षेपशून्य व ब्रह्मात्म- अखंड एकाकार झाली आहे, अशा तुझें चिन्मात्र परमार्थरूप सवीस पूज्य होईल. राघवा, हृदयातून सर्वाचा त्याग करून जो महामति अभिमानशून्य होऊन रहातो तो मुक्त परमेश्वरच होय. ज्याच्या सर्व आस्था पार निघून गेल्या आहेत तो, समाधीचा अभ्यास किंवा कम करो किंवा न करो, सदा मुक्तच आहे. ज्याचे मन वासनाशून्य असते त्याला नैष्कम्ये, कम, समा- धान, जप इत्यादिकाचा काही उपयोग नाही. त्याने शास्त्रविचार जितका केला असेल तितका पुरे आहे. विद्वानासह सवाद करून जेवढे ज्ञान सपादन केले असेल तेवढे बस आहे. आता त्याला केवळ भान केलें पाहिजे. कारण वासनारहित मौनावाचून दुसरे परम पदच नाही. दश दिशेस फिरफिरून नाना प्रकारचे कौतुक पहाणाऱ्या लोकांना तत्त्वदर्शन होणे शक्य नाही. त्यामुळेच तत्त्वज्ञ दुर्लभ असतात. प्राय: