पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६३८ बृहयोगवासिष्ठसार. सर्वकर्ता आहे किंवा मी जड दृश्यरूप नसून सर्व विलक्षण पूर्णानंद चिदात्मा आहे. या तीन दृष्टीतील तुला वाटेल ती दृष्टि घेऊन जेथें तत्वज्ञ उत्तम साधू स्थित आहेत, अशा त्या भात्मभूत सवोत्तम पदी आरुढ हो ५१. सर्ग ५७-रामाच्या प्रश्नाचा भनवसर, वासनावर्जन-क्रम, त्याच एका उपायाने सिद्ध झालेल्यांची प्रशंसा. श्रीराम-महाराज, आपण सांगितलेत ते सर्व खरे आहे. भूतकर्ता वस्तुतः भकर्ता व अभोक्ता असतानाच कर्ता व भोक्ता असल्यासारखा भासतो. तो सर्वेश्वरच हे सर्व आहे. आपण सागितलेले ब्रह्म माझ्या चित्तात आता चागले आरूढ झाले आहे. मेघजलाची वृष्टि झाली असता ग्रीष्म- तूंतील उष्णाने तापलेला पर्वत जसा शात होतो त्याप्रमाणे आपल्या उक्तींनी मी शात झालो आहे. औदासिन्य व भनिच्छा यामुळे तो देव काही करीत नाही व भोगीत नाही. पण तोच सर्व प्रकाशक असल्यामुळे सर्व करतो व भोगतो, हे सर्व मला चागले समजले. आता एक संशय राहिला आहे. तेवढा घालावा म्हणजे झाले. एका आत्मतत्त्वामध्ये हे सत्, हे असत् , समष्टिच मी आहे व देह मी नव्हे, हा प्रपच समष्टि-दृष्टया एक व व्यष्टि-दृष्टया अनेक इत्यादि विकल्प कसे रहातान ! श्रीवसिष्ठ-रामा, या तुझ्या प्रश्नाचे स्थिर उत्तर मी सिद्धाताच्या वेळी ( म्हणजे निर्वाण-सज्ञक सहाव्या प्रकरणाच्या उत्तरार्धात पाषाणा- दिकान्या आरव्यायिकेंत) देईन. कारण ते तुला त्याच वेळी तत्त्वतः कळेल. राघवा, तुला उपदेशाचा सिद्धात ( म्हणजे निष्टारूप अखडाकार बोध) जोपर्यत प्राप्त झालेला नाही, तोपर्यत या प्रश्नाची उत्तरें ऐकण्यास तू योग्य नाहीस, रमणींच्या विषयप्रधान गायनाचे व उक्तींचे तरुणच भाजन अमतो. अल्प बालक नव्हे. त्याचप्रमाणे या सर्वोत्तम प्रश्नाचे उत्तर ऐकण्यास महा पुण्यवान् जनच पात्र असतात. अल्प पुण्यवान् व अल्पज्ञ नव्हेत. शरहतृत लागणारे फळ शरत्समयीं जसं शोभते तसें वसंतसमयीं शोभत नाही. ज्ञानवृद्ध व विवेकीजन यान्या चित्तात वैराग्याच्या गोष्टी जशा ठसतात तशा विषयासक्त व अधिकी जनाच्या हृदयात ठसत नाहीत. शुक्राच्या उपाख्यानाच्या शेवटी या प्रश्नाचे उत्तर मी अशतः दिले आहे. पण ते तुला कळले नाही. तुला अखड तत्वाचा बोध झाला म्हणजे माझ्या उत्तरावाचूनच तुझा सशय आपोआप नाहीसा होईल. माझा उप-