पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १९. ११० मोक्ताही नव्हे. पण सर्व इंद्रियांच्या अंतर्गत असल्यामुळे तो काही आहे व भोक्ताही आहे. सारांश रामभदा, कर्तृता व अकर्तृता हे दोन्ही भाव भाम्यामध्ये असतात. त्यांतील ज्याच्या योगानें तुझे कल्याण होईल असे वाटत असेल, त्याचाच भाश्रय करून तूं स्थिर हो. मी अकर्ता व सर्वामध्ये स्थित आहे भशी दृढ भावना केल्यावर तूं ओघाने प्राप्त झालेलें कार्य जरी केलेंस तरी त्याच्या योगानें लिप्त होणार नाहीस. कारण अकर्तृ-भावनेने तूं प्रवृत्तीविषयी नीरस ( विरक्त ) होशील. मी नित्य अकर्ता आहे, अशी भावना केल्यास परमामृत नावाची समता अवशिष्ट रहाते. बरें, मीच हे सर्व करतो, असें म्हणून महाकर्तृतेचा आरोप जरी आपल्या ठिकाणी कोणी केला, तरी त्याला राग-द्वेषादि प्राप्त होत नाहीत. कारण सर्वक- र्तृता स्वीकारल्यावर अने पाळलेल्या शरीराला बनें जाळले, असे म्हणण्याची सोयच नसल्यामुळे, खेद व हर्ष यांना अवकाशच रहात नाही. कारण शरीराला पाळणारा व जाळणारा मीच आहे, असा त्याचा निश्चय झालेला असतो. सुख, असुख, उदय, अस्त इत्यादि सर्वांचा कर्ता मीच, असें मनां' तल्या मनात जाणणारा पुरुष खेद व हर्ष करीत नाही आणि त्या दोन्ही भावांचा क्षय झाला असता समता अवशिष्ट रहाते. सर्व भूतांचे ठायी समता ठेवणे ही परा स्थिति आहे. त्या सत्य स्थितीत ज्याचे चित्त भव. स्थित झाले आहे, तो पुनः जन्मभाक् होत नाही. अथवा, बा प्रिय शिष्या, सर्व-कर्तृत्व व अकर्तृत्व या दोन्ही दृष्टींचा त्याग कर आणि मनाला नाहीसे करून जसा आहेस तसा रहा. कारण हा मी, हा मी नव्हे, मी हे करतों, हे करीत नाही, इत्यादि अनुसंधान कर- मेंही दुःखाचे मूळ आहे. त्याच्या योगानें खरें समाधान होत नाही. पण असे असतानाही आम्ही जे त्याचें अनुसंधान करण्याविषयी सांगितले आहे ते केवळ देहात्मभाव जावा याच हेतूनें होय. कारण देह मी असे समजणे ही भयंकर नरकस्थितिच आहे. यास्तव प्राण जाण्याचा जरी प्रसंग आला तरी शहाण्याने कुत्र्याचे मांस घेतलेल्या चांडालीप्रमाणे, तिला स्पर्श करू नये. सर्व प्रयत्नाने त्या कुदृष्टीचा त्याग केला, म्हणजे मेघांच्या भभावी जसें चांदणे त्याप्रमाणे, परम दृष्टि उदय पावते. तिच्या योगानें भवसागरांतुन तरून जाता येते. यास्तव रघुत्तमा, मी कर्ता नव्हे; अथवा मी