पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ बृहद्योगवासिष्ठसार. विचित्र कथा चालल्या असता ती दीर्घ यामिनी केव्हां निघून गेली तेंही कळलें नाही. अरुणोदय होताच पूर्व दिशेचें मुख सतेज झाले. पण बिचाऱ्या तारका फिक्या पडल्या. त्या वृक्षावरील सर्व शुभ पक्षी व खालचे बहुतेक पशू जागे होऊन रम्य ध्वनी व चेष्टा करूं लागले. पण आपला अनिष्ट काल जवळ आला आहे, असें जाणून घुबडे घाबरली. रात्रभर स्वच्छेने फिरणारे सर्प बिळे शोधू लागले आणि निशाचर आता दिवसभर कोठे लपून रहावे ? या चिंतेत पडले. असो; रामा, लागलाच मी त्या पिता-पुत्रास विचारून तेथून निघालो. तेही दोघे सत्पुरुष माझ्या मागोमाग काही अंतरावर मला पोचविण्याकरिता आले होते. पण मी त्या नम्र साधूंना परतवून मदाकि- नीवर गेलो. त्या आकाश गगेच्या शीत व स्वच्छ जलात आह्लाददायी स्नान करून लागलाच मी आपल्या भाकाशगत स्थानी परत आलो. रघुनदना, जगाची प्रतिभा सत्य असल्यासारखी जरी भासली तरी ती असत्य आहे, हे तुला चागले समजावें, म्हणून मी ही दाशूराची कथा सागि- तली. आता तूं दाशूराच्या सिद्धाताप्रमाणे सदा उदार व आत्मानुसधान- वान् हो. विकल्परूप आत्ममळ घालवून तृ निमेल आत्मतत्त्व पहा. म्हणजे सर्व भुवनांत पूज्य होशील ६५. सर्ग ५६-जडाची सत्ता व असत्ता आणि चिनूची कर्तृता व अकर्तृता यांचा विचार करून सर्व दृश्याविषयीची आस्था सोडावी, असा उपदेश. श्रीवसिष्ठ--रामभद्रा, दिसते हे काही नाही, असा निर्णय करून 'अहं व मम' ही अध्यासरूप आस्था सोड. विवेकीजन अभावरूप वस्तु- वर आस्था ठेवीत नाहीत. ज्याचे स्वरूप अनिश्चित आहे त्यावर आस्था ठेवणे अगदी अयुक्त होय. या जगाला कोणत्या कारागिराने कोणत्या योग्य साधनानी रचिले आहे, ते सागता येत नाही. बरें कावाचूनच ते झाले आहे म्हणून म्हणावे तर कार्याला कर्त्याची अति आवश्यकता अस- ल्यामुळे तसेंही म्हणण्याचे धैर्य होत नाही. यास्तव हे भ्रमाने आपोआप भासतें असेंच ठरवावे लागते. पण रामा, जगज्जाल कर्त्याने केलेले असो की, अकर्तृक झालेले असो तूं त्या मलिनाची भावना करीत बसू नको. आत्मा सर्व इंद्रिय-रहित व त्यामुळेच पर्वतादिकांसारखा जड असल्याप्रमाणे आहे. यास्तव त्याचे कर्तृत्व औपचारिक आहे; खरे नव्हे. म्हणूनच आम्ही हे सर्व जग परमार्थतः कर्तृशून्य व काकतालीयन्यायाने