पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६३२ बृहयोगवासिष्ठसार स्वरूप जर पाहू लागले तर ते विजेसारखे चंचल, भ्रमात पाडणारे, क्षणभंगुर, प्रदीप्त व जगामध्ये आकाराने प्रकट न होणारे आहेत, असे कळतें. पुत्रा, आता त्याच्या नाशाचा उपाय सांगतो. जें असत्य अज्ञान विकार- भूत असते त्याचीच सत्वर चिकित्सा करता येते, यात संशय नाही. मसत् कधीही सत् होत नाहीं; तसेंच सत् असत् होत नाही, असा नि- यम आहे. यास्तव संकल्प जर सत् असता तर त्याची चिकित्सा अशक्य झाली असती. पण तो स्वतः असत् आहे व त्यामुळे सुचिकित्स्य आहे. कोळशाच्या काळेपणाप्रमाणे ससार मळ जर स्वाभाविक असता तर तो धुवून टाकण्यास कोणता मूर्ख तयार झाला असता ? पण तो तांदळावरील कोंड्याप्रमाणे असल्यामुळे त्याचे निरसन करून तादुळासारख्या शुद्ध मात्म्याला व्यक्त करता येते. पुत्रा, दीर्घ प्रयासाने अनादि संसाराचीही निवृत्ति करता येते. बाळा, हा संसारमळ जरी सर्वतः दाट पसरला आहे तरी तो तत्त्वज्ञाला अनायासाने घालविता येतो. कारण स्वमादि भ्रम केवळ प्रबोधाने (जागे होणे अथवा ज्ञान यांच्या योगानें ) तत्काल क्षीण होत असल्याचे आपण प्रत्यक्ष पहातो. असंभावना, विपरीत-भावना इत्यादि मळ ज्ञानभूमिकाभ्यासरूपी पुरुष प्रयत्नाने नष्ट होतात. यास्तव तूं उद्यम कर. मिथ्या संकल्प व विकल्प यानी युक्त असलेला व अगदी स्वल्प उपायानेही नष्ट होणारा हा ससार तू आजवर उगचि जिकला नाहीस. अरे बाबा, असत् वस्तु चिरकाल कशी रहाणार ! पत्रा, हा ससार किंवा त्यातील इष्ट विषय तुझे आहेत व तू त्याचा आहेस ही भ्राति सोड. कारण सर्वच आत्मा असल्यामुळे त्यात विषय-विषयी-भाव रहाणे शक्य नाही ५४. सर्ग ५५-दाशर व वसिष्ट याचा संवाद, वसिष्ठानी कदंबशोभा पाहिली व उजा' ल्यावर गमन गेले. श्रीवसिष्ठ-रघुनंदना, रात्री पिता-पुत्रांचा, त्या वृक्षावर बसून, चाल- लेला हा संवाद मी ऐकला आणि मुकाव्याने पाने, फुले व फळे यांनी मेरलेल्या त्या कदंबावर उतरलो. तेथे बसलेल्या दाशूरास पाहिलें. इंद्रिय- निग्रहाविषयी अति शूर असलेला तो मनि तपाच्या योगाने अनीसारखा दीप्त दिसत होता. देहांतून निघणाऱ्या प्रभेने त्याने भूतळ सोन्यासा- रखे करून सोडले होते. सूर्य जसा भुवनास तप्त करतो त्याप्रमाणे तो त्या