पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५० बृहयोगवासिष्ठसार. झाला आहे. मृगजळ अथवा दोन चंद्र या विवर्ताप्रमाणे जंग हाही असत्य विवर्त आहे. पित्तप्रकोप करणारे पदार्थ खाले असता शुभ्रपदार्थही जसा पिवळा दिसू लागतो त्याप्रमाणे तुझ्या हृदयांत असत्य संकल्प आपोआप येतो. तु असत्यच उत्पन्न झाला आहेस. असत्य असूनही रहातोस. पण मी सांगत असलेले हे तत्त्व तुला बरोबर कळले म्हणजे तुझ्या ठिकाणचा असत्य अंश लीन होईल, वेदांतांत प्रसिद्ध असलेला पूर्णात्मा मीच आहे. माझे सुख-दुःखादिमय जन्मादि भाव मिथ्या आहेत, असे ज्ञान नसल्यामुळेच तूं संतप्त होत आहेस. आपल्याच सकल्पामुळे तू व्यर्थ मूढ होत आहेस. यास्तव बाळा, सकल्प करू नकोस. वर्तमानसमयीं, पूर्वी अनुभविलेल्या मुख-दुःखाचे स्मरण करू नकोस. भ्रमनिवृत्तीचे हेच दोन उपाय आहेत. कारण सकल्पाचा क्षय झाला म्हणजे सर्व प्रकारचे भय क्षीण होते. आणि पूर्व भावाचे स्मरण केले नाही, म्हणजे सकल्प आपोआप क्षय पावतो. पुत्रा, हा उपाय फारच सुकर आहे. कोमल पल्लव व पुष्पें याना चुरावयाचे झाल्यास थोडासा तरी प्रयत्न लागतो पण केवल भावना आणि संकल्प न करणे याला प्रयत्नाची मुळीच गरज नाही. ( कारण आपल्याला काही कार्य करावयाचे असल्यास त्याकरिता कमी-अधिक प्रयत्न करावा लागतो पण जे करावयाचे नसते त्याकरिता प्रयत्न मुळीच करावा लागत नाही. है सर्वांना ठाऊक आहे.) कोठे जावयाचे झाल्यास प्रयत्न, जावयाचे नस- ल्यास प्रयत्न मुळीच नाही, फुलझाडावरील फूल काढावयाचे झाल्यास त्याकरिता आपल्याला हात उचलावा लागतो. पण सकल्प सोडावयाचा झाल्यास तेवढाही प्रयत्न करावा लागत नाही. ज्याला सकल्पाचा क्षय करावयाचा असतो त्याला गत गोष्टींचा विचार न करणे या एकाच उपायाने निमिषार्धात तो करिता येतो. पण-सकल्पक्षयाने दुःखक्षय झाला तरी निरतिशय आनदाची प्राप्ति कशी होईल-म्हणून विचारशील तर सांगतों-मी पूर्ण आनदरूप आहे, असे निरंतर चिंतन करणे या एकाच उपायाने स्वतःसिद्ध आनंद अभिव्यक्त होतो. (तो नवा उत्पन्न होत नाही.) आजपासून सकल्प करावयाचा नाही, या एका संकल्पाने सर्व संकल्पांचा व आत्मतत्त्वमननरूप मनाने विषय-विक्षिप्त मनाचा छेद करून तूं आत्म्यामध्ये स्थिर होऊन रहा. हे काही फारसे दुष्कर नव्हे. या दोन उपायांनी संकल्प समूळ नष्ट झाला असता दुःखही समूळ नाहीस