पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२९ १ स्थितिप्रकरण-सर्ग १४. आहे. तेच त्या पदार्थाचे तत्काल होणे आहे. शिवाय संकल्पित पदार्थाचा बीजभाव सकल्प-समयींच उत्पन्न होऊन मनांत संस्कार अथवा बासनारूपाने रहातो, हेही प्रत्येकास थोड्याशा विचारानेच कळण्यासारखें आहे.) यास्तव बाळा, तूं मुळी कशाचा संकल्पच करूं नकोस. तूं निःसंकल्प व प्राप्त होईल तो व्यवहार करणारा हो. संकल्पाचा क्षय झाला असतां चित्त आपोआप आत्माभिमुख होतें. सत्यैकस्वभाव ब्रह्म असत्य मायावशात् योनिद्वारा प्राणिरूप होते आणि व्यर्थ जगदुःख भोगते. पण ते त्याला योग्य नव्हे. केवल दुःखाकरिताच वारंवार मरण्यांत कोणता पुरुषार्थ आहे ? प्राज्ञ जन ज्याच्या पासून सुख होईल त्याचाच आश्रय करितात. यास्तव बाळा, तूही तत्त्वज्ञानी हो. विकल्प-जालाचे बलात्काराने उन्मूलन कर व अद्वितीय मोक्षाख्य पद अक्षय सुखाकरिता स्वप्रयत्नानें संपादन कर. तुझी चित्तवृत्ति निजल्यासारखी शांत झाली म्हणजे यातील काहीएक अशक्य नाही, असें तुझें तुलाच कळेल ५३. सर्ग ५४-संकल्पाची उत्पत्ति, रूप, घनता व उच्छेदाचा उपाय. श्रीवासष्ठ-राघवा, त्यानतर 'बाबा, सकल्प कसा असतो, वृद्धि कसा पावतो व नष्ट कसा होतो?' असा पुत्राने प्रश्न केला असता दाशूर त्यास म्हणाला:-"बाळा, अनंत, सत्तामात्रस्वरूपी व चित्-अशा आत्मतत्त्वाचे विषयोन्मुखत्व हाच संकल्पवृक्षाचा अविद्याबीजोद्भव प्रथम अंकुर होय. त्यालाच मागें मन असे म्हटले आहे. चित्-लेमाने जो सत्तावान् शाला आहे. असा तोच अकुर चित्ताकाशास सर्वतः व्यापून, अधिष्ठानचैत- न्याच्या चित्स्वभावतेस झाकून सोडून जड प्रपंचाकार करण्याकरिता मेघा- प्रमाणे हळु हळु घन होतो. (म्हणजे समष्टिमनाच्या संकल्पापासून जगाचा उद्भव होतो.) नंतर चेत्य म्हणजे चिद्विषय आपल्याहून जणु पृथक् आहे भशी भावना करणारी चिति, बीजाकुर-न्यायाने, संकल्पतेस प्राप्त होते. (म्हणजे बुद्धि-अहंकार-प्राण-इंद्रिये-देह इत्यादि आकाराचा व्यष्टिसंकल्प उत्पन्न होतो.) नंतर मूलाकुरापासून जसे शाखांकुर उत्पन्न होतात त्याप्र- माणे संकल्पापासून सकल्प आपोआप उत्पन्न होतो आणि दुःख देण्याकरिता आपोआप वाढतो. सुखाकरितां नव्हे. समुद्र जसा जलमात्र तसे जग संकल्पमात्र. संकल्पावाचून दुसरे संसारदुःख कोणतेच नाही. निर्विकार व भद्वय वस्तूच्या ठिकाणीही काकतालीय न्यायाने उगीचच जगाचा उदय