पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२८ बृहद्योगवासिष्ठसार. प्राप्त होतात. सत्त्वसंकल्प धर्म व उपासना (अर्थात् शास्त्रीय प्रवृत्ति) यांमध्ये परायण होतो. त्यामुळे त्याला स्वाराज्य (म्हणजे हिरण्यगर्भाच्या पदापर्यंत उत्तरोत्तर देवताभाव ) प्राप्त होते. त्याच्यापासून मोक्ष दूर नसतो. रजोरूप संकल्प मनुष्यजन्म घेऊन त्याला योग्य असा व्यवहार करतो व पुत्र, स्त्री इत्यादिकांवर आसक्त होऊन तो संसारांत स्थिर रहातो. पण, हे महामते, हे त्रिविध रूप सोडून सकल्पाने आपला अस्पंत उच्छेद करून घेतला असता तोच स्वतः मोक्षरूप होतो. पुत्रा, आतां मी तुला संकल्पक्षयाचा उपाय सांगतो. बाह्य इंद्रियांचे वैराग्याने नियमन करून विवेकानें मनाचाही निग्रह कर आणि बाह्य व आभ्यंतर विषयां-विषयींच्या संकल्पाचा क्षय कर. बाळा, तूं जरी सहस्रा- वधि वर्षे दारुण तप केलेंस, अथवा आपल्या विनाशी शरीराला पाव्यावर वाटलेंस, किंवा अग्नीत अथवा सागरांत उडी घातलीस, पर्वताच्या कड्या- वरून आपल्याला ढकललेंस, तरवारीच्या धारेनें आपले शतशः तुकडे करून घेतलेस, साक्षात् ब्रह्मा, विष्णु व महेश यांच्यापासून जरी तूं उप- देश घेतलास, अथवा अति दयाळु दिगबर दत्त जरी तुला उपदेश करा- वयास आला व तूं जरी स्वर्ग, भूमि व पाताळ यांतील कोठेही जाऊन राहिलास तरी संकल्पशातीवाचून मुक्त होण्यास दुसरा उपाय नाही. यास्तव वत्सा, त्या परम पावन सुखासाठी तू संकल्पशाति संपादन कर. दृढ निश्च- याने त्याच एका उपयाचा सतत अभ्यास कर. संकल्पदोरीमध्येच हे सर्व भाव भोवलेले आहेत. पण त्यांची आधारभूत दोरी तोडली म्हणजे ते कोठे जातात ते काही समजत नाही. संकल्पानेच सत् असत होते व असत् सत होते. म्हणजे सर्व विकल्प संकल्पाबरोबर उठले आहेत. पण ते आपल्या कारणरूप संकल्पालाच बरोबर ओळखू शकत नाहीत. तो सत् आहे की असत् हे त्यांना कळत नाही. सर्व कार्याची हीच स्थिति आहे. मग कार्ये आपल्या जनक कारणाचे ठायीही जर कुंठित होतात तर ती असंग परमात्म्याला कशी ओळखू शकणार ? प्राणी जसा जसा संकल्प करतो त्या-त्याप्रमाणे एका क्षणात सर्व होते. (प्रारब्ध प्रतिबंधा- मुळे भामच्या पुष्कळ संकल्पाचे फळ त्याच क्षणी आपल्या अनुभवास येत नाही, असे येथे कोणास वाटेल, पण ते बरोबर नव्हे. कारण संकल्पसमयी सर्व विचति संकस्मित पदार्थमय होते असा अनुभव