पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ५३. ६२७ व त्यामुळे त्याला नुक्त्याच उद्भवलेल्या त्या देहांत शिरतां येतें माणि सं- कल्प सोडतांच तो आपोआप नाश पावतो. जाग्रत् व स्वप्न या दोन अवस्थामध्ये विक्षपामुळे त्याला पुष्कळ आयास होतात. ते घालविण्या- करितां तो ( जीव ) संकल्प सोडून आपोआप आपल्या कारणात लीन होतो. त्याला तेथें विश्राति मिळते. (ही विश्राति सुषुप्ति, मरण, व समाधि या तीन अवस्थात मिळते. त्यातील पहिल्या सुषुप्तीत जीवाचा म्हणजे संकल्पप्रधान मनाचा लय होतो. मरणसमयीं तो कारणभूत अविद्यामात्र होतो व समाधीच्या वेळी साक्षात् स्वस्वरूपास मिळतो.) भाता पुनः तो उत्पन्न कसा होतो, ते सागतो. एकाद्या लहान मुलाने कल्पि- लेल्या यक्षाप्रमाणे केवल कल्पनामय असा तो आपोआप आपल्या अनंत दुःखाकरिताच उत्पन्न होतो. नतर आपल्या सत्तेनें तो हे सर्व जग म्हणजे विपुल दुःखच निर्माण करतो आणि आपल्याच असत्तेने त्याचा नाश करतो. तो आपल्याच दुःखदायिनी निषिद्ध आचरणाभिमानरूप चेष्टेने दुःखी शिऊन, अर्ध्या चिरलेल्या तुळईमध्ये ठोकलेली खुटी उपटून, तुळईच्या मांधींत मर्मस्थान अडकल्यामुळे, प्राण जाण्याचा प्रसग आला असतां भओरडणा-या घानराप्रमाणे, रडत बसतो. अकस्मात् पुढे पडलेला मधाचा ब चाटून जसा गर्दभ आनदित होतो, त्याप्रमाणे जीव आपल्या सकल्पित विषयानंदाचा लेश मिळताच छाती पुढे काढून, डोके वर उचलून व हात फुगवून चालू लागतो. (पण गर्दभाला मध मिळणे जसे दुर्लभ तसेच जीवाला भोगसुख मिळणेही दुर्लभ आहे. मग मोक्षसुखाची वार्ता तर दूरच राहिली.) तो बालकाप्रमाणे आपल्या सकल्पानेच एका क्षणात विरक्त होतो. एका क्षणात अनुरक्त होतो व एका क्षणात विकारयुक्त होतो. ___ यास्तव हे माझ्या लाडक्या, या संकल्पालाच सर्व बाह्य वस्तूपासून पर- तवून चित्तैकाग्र्याचा अभ्यास व तत्त्वज्ञान याच्या योगाने निमूल करून सोड. सर्व वासना सोडणे हेच त्याला निर्मूल करणे आहे. त्यानंतर तुझी मति प्रत्यगात्मभूत ब्रह्माचा आश्रय करून विश्राति घेईल असें थैकर. AITEथा समांत सागितलले उत्तम, मध्यम 4 अधम देह कोणते तें आता सांगतो. सत्त्व, रज व तम या नावाचे ते तीन देहच या जगाच्या स्थतीचे कारण आहेत. तमोरूप संकल्प, प्राकृत चेष्टेच्या ( म्ह. स्वाभा- वेक प्रवृत्तीच्या) योगाने नरकातील प्रसिद्ध कृमि-कीट-स्थावर इत्यादि भावांस