पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२६ बृहद्योगवासिष्ठसार. मार्ग असून त्यात नर पंचमहायज्ञजन्य पुण्य हे धन देऊन देवापासून वृष्टि- प्रभृति वस्तू विकत घेतात. देवही मानवांस आपल्या जवळचे अमृत, वृष्टि, प्रकाश इत्यादि धन देऊन त्याच्या पासून हव्य विकत घेतात. याच न्यायाने त्या सर्व बाजारभर प्राण्यांची देव घेव-एकसारखी चालली आहे. पुण्य व अपुण्य ही दोनच नाणी त्या पेठेत चालतात, आणि सुख व दुःख या दोनच जिनसांची तेथें प्रायः सर्व जीव खरेदी करीत असतात. त्या संकल्पराजाने आपल्या या जगन्नगरात आपल्या क्रीडेकरितां विचित्र देहरूप खोल्या रचल्या आहेत. त्यातील कित्येकास देव असे नाव देऊन ऊर्ध्वप्रदेशी नियुक्त केले आहे. नर, नाग इत्यादि दुसऱ्या कित्येकाची खाली योजना केली आहे. मासरूपी मातीने लिंपलेल्या त्या खोल्या प्राण- सज्ञक वातयत्र-प्रवाहाने चालतात. शुभ्र हाडे हीच त्यातील लाकडे व त्वचा हाच त्यास वरून केलेला रम्य व मृदु गिलावा होय. आपापल्या आयुर्मर्यादेप्रमाणे ती शरीरें क्रमाने नाश पावतात. कान, नाक, तोंड इत्यादि त्याची नऊ द्वारे आहेत. त्याच्या डोक्यावर केमाचे छप्पर आहे. नाकपुड्या ह्याच त्याच्या मुख्य विडक्या असून त्यातून प्राण हा उष्ण वायु व अपान हा शीत वायु एकसारखा वहात असतो. हात, पाय इत्यादि त्यातील मार्ग असून श्रोत्र नेत्रादि पाच इंद्रिये हेच त्यात लावलेले पाच दिवे होत. त्यातील प्रत्येक देहात अहकार या नावाचा सकल्पानेंच निर्मि- लेला एकेक यक्ष त्याचे रक्षण करण्याकरिता टविलेला आहे. ते सर्व यक्ष परमात्म-दर्शनास फार भितात. कारण आ-मज्ञान झाले म्हणजे हृद- यप्रथिरूप अहकार क्षीण होतो, असा अनुभवही आहे. म्हणून ते त्याला भितात. उघडच आहे की, आपल्याला निश्चयाने ठार मारणान्या बलाढ्य शत्रुला कोण भिणार नाही ? देहच अहकार आहे, असे काही लोक सम- जतात. पण ते बरोबर नाही. कारण देह हा आधार असून त्यांत टोप- लीतील माजराप्रमाणे, पिशवीतील मर्याप्रमाणे अयया वेळूनील मोत्याप्रमाणे हा अहंकार आधेयभावाने रहातो. समुद्रातील तरंगाप्रमाणेच संकल्पतर- गही देहगृहामध्ये दिव्यासारखे क्षणात उदय पावतात व क्षणात शांत होतात. आता तो राजा भविष्यत्-नगरात कसा जातो ते सागतो. मनो- राज्य, स्वन इत्यादि अवस्थामध्ये जेव्हा तो आपल्या इष्ट देहनगराचा संकल्प करतो, तेव्हां सकल्पित देह उत्पन्न झाला आहे असें तो तत्काल पहाता