पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ स्थितिप्रकरण-सर्ग ५३. ६९५ दुसऱ्यांवर चाल करून जातो व त्यांचा पराभव करतो. संपत्ति मिळवतो. धनमद वहातो. इष्टानिष्ट व्यवहार करतो. जाग्रत् व स्वप्न या अवस्थांमध्ये तो भासतो व सुषुप्ति, मरण, समाधि यांत भासत नाही. पण तो अंतर्गत आत्मज्योतीने सदा भासुर असतो १०. सर्ग ५३--विश्व संकल्पकल्पित आहे, याविषयी सांगितलेल्या खोत्थाच्या भाख्यानाचे तात्पर्य. श्रीवसिष्ठ-रामा, कदबाच्या अग्रशाखेवर बसून पित्याने सागितलेले हे अद्भुत आख्यान ऐकून पुत्र म्हणाला:-" बाबा, खोत्थ नांवाचा हा प्रख्यात राजा कोण? व तुह्मी हे मला काय सांगितलेत ? भविष्यत् ( पुढे होणार ) नगर कोठे व तो त्याच वेळी त्यांत जातो कसा? या आख्या- यिकेचे तात्पर्य मला काही समजले नाही." पुत्राने असे सांगितले असतां दाशूर म्हणतो-बाळा, या कथेचे रहस्य मी तुला सांगतों; म्हणजे संसार. चक्राचे तत्त्व तुला कळेल. ही संसाररचना असत् (परमार्थ-सत्ता-शून्य) नसतानाही अज्ञानामुळे तिचा उद्भव झाला आहे. अर्थात् ती मायामय आहे. हे तत्त्व तुला चागल्या रीतीने कळावे, म्हणून मी ही कथा सागितली. परम आकाशापासून संकल्पप्रधान मन होते. त्याच्या समष्टि-व्यष्टि-भावाचें एकीकरण करून त्यालाच मी येथे खोत्थ असे म्हटले आहे. प्रवृत्तिवा- सनेमुळे तो आपोआप उत्पन्न होतो व निवृत्ति-वासनेमुळे आपोआप लीन होतो. हे सर्व विस्तृत जग हा त्याचाच परिणाम आहे. कारण त्याचा उद्भव झाला असता हे सर्व होते व त्याचा लय झाला असतां हे सर्व जाते. वक्षाच्या शाखांप्रमाणे अथवा पर्वताच्या शिखराप्रमाणे ब्रह्मा, विष्णु, इंद्र, रुद्र इत्यादि सर्व त्याचे अवयव आहेत. केवल अधिष्ठान चैतन्याच्या अनुग्रहाने चेतन ब्रह्माकार होऊन याने शून्य (जगदभावयुक्त) आकार शांत ( ब्रह्मामध्ये ) आपलें त्रिजगत्पुर निर्मिलें. त्यातच हे चवदा लोक विस्तार पावलेले असून ते जणुं काय प्राण्यांचे कोशच भाहेत. त्यांत वनें, उपवनें, उद्याने, सह्य, मेरु, विध्य, मंदार इत्यादि क्रीडा पर्वत, सूर्य व चंद्र हे ऊन व थंड दिवे, ज्यांच्या पात्रांतील जल-बिंदू सूर्याच्या किर- णांनी, मोत्यांसारखे चमकत असतात, अशा गंगा, यमुना, सिंधु, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी इत्यादि नद्या, व क्षीरादि सात समुद्र याच सात विहिरी भाहेत. भूमी व स्वर्ग यांच्या मधील अंतराल प्रदेश हाच मोठा बाजार ४.