पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६१४ वृहद्योगवासिष्ठसार. बाळा, त्या नगरात त्या राजाने ससारी ( जंगम, चर,) व विषयांत आसक्त होणाऱ्या लहान लहान (मानुषादि शरीररूप) खोल्या केल्या आहेत. त्यातील काही खाली, काही वर, व काही मध्ये आहेत. पण त्या सर्व विनाशी असून त्यातील काही फार दिवसांनी नाश पावणान्या व कांही सत्वर नाश पावणाऱ्या आहेत. त्या खोल्या ( केंसरूपी) काळ्या गवताने आच्छादित केलेल्या आहेत. नऊ द्वारानी भूषित केल्या आहेत. ज्यांतून सतत वारा वाहत आहे अशी पुष्कळ वातायने (खिडक्या) त्यास आहेत. (ज्ञानेद्रियसज्ञक ) पाच दीपाच्या योगाने त्या खोल्या प्रका- शित झाल्या आहेत. दोन माड्या व तिसरा पाठीचा कणा या तीन खंभाचा त्याना चागला आचार आहे. शुभ्र हाडे हेच त्यातील वेळू असून त्यास वरून मऊ चामड्याने मढविले आहे. हात हेच त्यातील दोन मार्ग आहेत. त्या महात्म्या राजाने मायेनेच त्या खोल्यावर 'मी' असा अभिमान ठेवून त्याचे रक्षण करणारे यक्ष (पूज्य अहंकार ) उत्पन्न केले आहेत. ते ( आत्मविवेकम्प) प्रकाशास फार भितात. असो, अशा त्या असख्य खोल्या व्यवहार करू लागल्या, म्हणजे घरटयातील पक्ष्याप्रमाणे तो राजा (संकल्परूप जीव ) विविध क्रिया करितो. याप्रमाणे शेकडों त्रिशरी- रांतल्या यक्षांसह, लीलेनेच त्याच्या वश न होतां, राहून तो पुनः तेथून निघून जातो. वत्सा, त्या चलचित्त पुरुषाला पुनः केव्हा तरी अविद्यमान (ज्याची उत्पत्ति पुढे व्हावयाची आहे अशा ) स्वप्नादि जगात जावें अशी स्थिर इच्छा होते आणि अगात भूत शिरल्याप्रमाणे (निद्रादि) आवेशाने तो तेथून निघून (जाग्रद्-देहादिकाचा अभिमान सोडून ) धावत जातो. गर्वानी निर्मिलेल्या पुरासारख्या त्या आपल्या मिथ्या इष्ट पुरास पोचतो. पुत्रा, त्या चलचित्त पुरुषाला केव्हा केव्हा भी नष्ट व्हावे भसेंही वाटते व त्याबरोबर तो नष्ट होतो. (येथील नाश म्हणजे सुषुप्ति, सकल्पाच्या लयाची अवस्था असे समजावे.) पुनः आपल्या पूर्ण स्वभा- वापासून उत्पन्न होतो. पुनः मोठमोठी कर्मे करतो. पण त्या व्यवहारसमयीं शत्रु, रोग, दारिद्य इत्यादिकाकडून त्यास मोठी पीडा होऊ लागली असता 'हाय हाय, काय करूं! मी अज्ञ आहे. दुःखित माहे.' असें झणून तो शोक करूं लागतो. कदाचित् त्याला आनद होतो व पुनः दुःख होते. तो पुनः दीन होतो. तात्पर्य, हे पुत्रा, तो महात्मा राजा, भंगांत सामर्थ्य असल्यास