पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२२ बृहद्योगवासिष्ठसार. " भगवन् , हा तो आमचा भव्य कुमार आहे. मी त्याला सर्व कलांमध्ये कुशल केले आहे. पण हे प्रभो, त्याला केवल शुभ ज्ञान प्राप्त झालेलें नाही. यास्तव, हा पुनः या ससारचक्रांत पडणार नाही, असे ज्ञान आपणच याला शिकवा. आता याला ज्ञानोपदेश करण्यास आपणच योग्य आहों. शिवाय कुलीन पुत्रास मूर्ख कोण राहू देईल ? " रामा, ही तिची प्रार्थना मान्य करून दाशूराने तिच्या पुत्राला आपल्या पाशी ठेवून घेतले व तिला परत पाठविले. ती गेली असता तो बालकही पित्याचा अतेवासी (शिष्य ) होऊन राहिला. परिचर्यादिकामळे होणारे क्लेश सहन करीत तो तेथे काही दिवस राहिला असता पित्याच्या विचित्र उक्तींनी त्याला परोक्षज्ञान झाले. तथापि त्याला आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान व्हावे म्हणून त्याच्या पित्याने त्याला आख्याने, आख्यायिका, इतिहास, वेद-वेदात-निश्चय इत्यादिकाच्या योगाने पुष्कळ दिवस बोध केला. (केवल सिद्धाताचेच एकसारिखे प्रतिपादन करू लागल्यास श्रोत्याला कटाळा येतो. म्हणून उत्तम प्रतीचे उपदेशक त्यास आख्यानादिकाच्या योगाने रम्य व चित्ताकपेक करीत असतात.) हा आपला पुत्र प्रत्यगात्म्याचे ठायीं दृढनिष्टायुक्त व्हावा ह्मणून त्याने त्याला अतराळी वृक्षानावर बसूनच अनेक कथा सागितल्या ५१. सर्ग ५२-सकल्पाने कल्पिलेले विश्व मिल्या आहे हे सागण्याच्या इच्छेन आका शोत्थ राजाचे कल्पित चरित्र येथे सागतात. श्रीवसिष्ठ-राघवा, एकदा मी गगेंत स्नान करण्याकरितां अदृश्य आकाराने आकाशमार्गाने जात होतो. सात ऋषींचे मडल हा ज्याचा एक भाग आहे अशा विपुल आकाशातून निघून मी शात रात्री दाशूराच्या उंच कदंब वृक्षावरून जात असताना याच्या अन शाखेच्या पल्लवगुहेतून ऐकू येणारे, कमलाच्या कळ्यात अडकृन राहिलेल्या भ्रमराच्या गुजारवाप्रमाण फारच रमणीय वचन माझ्या कानी पडले. निर्जन वनात मनुष्यवाणीचा प्रायः असभव असल्यामुळे कौतुकाने मी आकाशात थावून ऐक लागलो. तो हे शब्द माझ्या कानी पडले- महाबुद्धिमान् पुत्रा, या ससारासारखीच एक अति आश्चर्यकारक कथा मी तुला सागतो, ती ऐक. एक महा वीर्यवान व त्रिभुवनात प्रख्यात अस। खोत्थ-(आकाशातून उठलेला ) नावाचा राजा आहे. तो जसा श्रीमान्