पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२९. बृहद्योगवासिष्ठसार. घेतले आहेत, ज्यांच्या शरीरावर अनेक विचित्र भूषणे आहेत, ज्यांनी प्रफुल्ल पमिनी धारण केल्या आहेत, ज्यांच्या तोंडाचा वारा फार सुगंधी आहे, भ्रमर, कोकिला इत्यादिकाचे घु घु ध्वनी हीच ज्यांची अव्यक्त व मधुर भाषणे आहेत, जलप्रवाहाचा खळ खळ ध्वनि हाच ज्यांच्या पायां- तील नूपुराचा ध्वनि आहे, अतःरिक्ष हीच ज्याची मस्तके, पृथ्वी हेच पाय. वनपती याच रोमपक्ती, जगले हेच पुष्ट नितंब प्रदेश व चद्र-सूर्य हीच कुंडले आहेत अशा प्रकारच्या त्या दाही दिशा त्रिभुवन वनितासारिख्या त्याला दिसल्या. तेव्हा अर्थात्च त्या महा मुनीला मोठा संतोष झाला ६०. सर्ग ५१- दाशूराचे मानसिक यज्ञ, त्यामुळे झालेला आत्मबोध, वनदेवतेच्या ठायी त्यास झालेला पुत्र व त्याला दिलेले ज्ञान.. श्रीवसिष्ठ-त्यानतर दारुण तपामध्ये शूर असलेला तो मुनी ताप- साच्या आश्रमात कदब दाशूर या नावाने प्रसिद्ध झाला. त्या शाखेच्या दलावर बसून व एका क्षणात दिशाकडे पाहून त्याने आपले मन त्याच्या- पासून परतविले व दृढ पद्मासन घालून परमार्थाचे ज्ञान नसल्यामुळे केवल कर्मामध्ये निष्ठा ठेवणाऱ्या त्याने फलाच्या इच्छेनें मनाने यज्ञ केला. अंतरिक्षात पसरलेल्या शाखेच्या पानावर बसूनच त्याने सकल्पाने आधाना- पासून अश्वमेधापर्यंत सर्व यज्ञक्रिया केल्या. तेथे दहा वर्षे बसून त्याने मनानेच गवालंभ, अश्वमेध, नरमेध इत्यादि विपुल दक्षिणायुक्त यज्ञानी देवाचे पूजन केले. एवढ्या अवकाशात कर्मसामथ्यामळे त्याचे चित्त रागादि मळशून्य झाले आणि त्या निर्मल चित्तात आत्मप्रसादजन्य ज्ञान बलात्काराने शिरले. ___ त्यानतर ज्याचे अविद्या-आवरण नाहीसे झाले आहे व वासनामळ गळून गेला आहे अशा त्याने एकदा शाखेच्या अग्रावर बसलेल्या एका वनदेवतेस पाहिले. तिचे नेत्र विशाल होते, वस्त्र पुष्पाप्रमाणे शुभ्र होते, त्या कामि- नीचे वदन मोठे होते. नेत्र मदाने फिरले होते. तिच्या भगास नील कम- लाचा वास येत होता व ती फारच मनोहर होती. असो; तो मुनि त्या सुंदरीस म्हणाला-" हे कमलाक्षि, तूं कोण ? भक्तीने प्रणाम करीत असलेली व लजेनेंही खाली मुख घातलेली तूं कोकिला व पुष्पभर याच्या योगाने वाकलेल्या लतेप्रमाणे दिसतेस. आपल्या कांतीने तूं पुरु-