पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ५०. वायून्या योगाने नाचणाऱ्या वेलींना, तो जणु काय अभिनय कसा करावा हेच शिकवीत होता. 'माझ्या सर्व शरीरावयवातील एकादाच अवयव फार तर रिकामा असेल बाकीचे मुळापासून अनापर्यंत सर्व भाग मृग, पशु, पक्षी, इत्यादि प्राण्यानी युक्त आहेत. वाहवा ! केवढे हे माझें परोप- कारित्व,' असे म्हणन, तो जणुं काय सतुष्टच होत होता, माझी मर्व अगें सफळ झाली आहेत, असे जाणून, हृष्ट झालेला तो आपले शाग्वारूपी हात पसरून जणुं काय नाचतच होता. त्याच्यावर चढलेल्या अनेक लताचा तो एकच कात असल्यामुळे, मत्त भ्रमराच्या गुजारवाच्या द्वारा जणु काय शंगाररसपूर्ण गायनच करीत होता. तो मोठ्या आदराने पुणे समर्पण करून, कोकलादिकाच्या मुदर ध्वनीनी, वरून जाणाऱ्या सिद्धाचे जणु स्वागतच करीत होता. वेली, पुष्पं व फळे यानी भरलेल्या व जवळच असलेल्या पाच कल्पवृक्षाना तो जणु काय आपल्या पुष्पादिकाच्या दीप्तीनी हंसतच होता. पारिजातास जिकण्याकरिता डोके वर करुन उद्धटपणाने वर जाणारा तो जणु काय प्रतिमल्लासारखाच दिसत होता. असो, साराश हे दशरथमुता, आपल्या फलयुक्त छायेने सर्व लोकाचें कल्याण करणा-या त्या सर्वोत्तम कदव वृक्षाला दाशराने पाहिले ४९. सर्ग ५०--कदबाच्या अप्रावर बसलेल्या दाशराने पाहिलेल्या दिशाचें, स्त्रियाच्या आकाराने, वर्णन. __श्रीवसिष्ट-- नंतर भूमि अपवित्र आहे, असे समजणाग दाशूर पुष्प- पर्वततुल्य, फलपल्लवशाली व द्यावापृथ्वीचा जणु काय मोठा स्तभच अशा या कदंब वृक्षास पाहून आनदित झाला आणि सर्व जलमय झाल्यावर भगवान विष्णु जसा वटवृक्षावर चढतो त्याप्रमाणे तो त्यावर चढला. याच्या अगदी शेवटच्या शाखेच्या टोकावर बसून तो तपस्वी निःशकपणे एकाग्रमनाने तप करू लागला. नूतन पल्लवरूपी मृदु-आसनावर बसून त्याने एकदा कौतुकाने चचल झालेल्या चित्ताने (म्हणजे व्युत्थानसमयी) सर्व दिशाकडे पाहिले. तेव्हा नद्या ह्याच ज्याच्या गळ्यातील एक पदरी माळा आहेत, मोटे पर्वत हेच ज्याचे स्तन आहेत, निर्मल आकाश हीच ज्याची वेणी आहे, चंचल निळे मेघ हेच ज्याच्या वेणीचे भाजूबाजूस लोंबणारे केस आहेत, नीलवर्ण पल्लव हीच ज्याची वस्त्रे आहेत, पुष्पाचा भर हीच ज्यांची कर्णभूषणे आहेत, सागर हेच पूर्ण कलश ज्यानीं कडेवर