पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६१८ बृहद्योगवासिष्ठसार. लाल कोमल पल्लव व त्यातूनच बाहेर आलेल्या आरक्त-शुभ्र मजिन्या याच्यायोगानें जो जणुं काय विडा खालेल्या तोंडानेच वनमालेस हसत आहे, ज्याची दीप्ति पूर्णचद्रासारखी आहे, ज्याच्या पालवीत बसलेले चकोर पक्षी अव्यक्त व मधुर धनी करीत आहेत अशा शाखानी जो व्याप्त झाला आहे, खाद्यावर बसलेल्या मोराच्या-खाली तिरकस लोंब- णान्या पिसान्यामुळे जो इंद्रधनुष्ययुक्त मेघानी व्याप्त झालेल्या आकाशा- प्रमाणे दिसत आहे, वारवार दिसून नष्ट होणाऱ्या चद्राच्या योगाने पूर्ण होणाऱ्या संवत्सराप्रमाणे प्रत्येक शाखेवरील ढोलीत जाऊन बसणान्या व पुनः बाहेर येणाऱ्या शुभ्र चमरसज्ञक हरिणाच्या योगानें जो पूर्ण आहे, कपिजल पक्ष्याच्या आलापानी, कोकिलाच्या मुदर कृजितानी व चकोराच्या ध्वनींनी जो जणु काय उचस्वराने गातच आहे, स्वर्गकोटरात रहाणान्या सिद्धाच्या योगाने जसे जगत् त्याप्रमाणे घरट्यात क्रीडा करणा-या कल. हसाच्या समूहानी जो आवृत झाला आहे, अप्सरा जशा स्वर्गाचा आश्रय करितात त्याप्रमाणे प्रवाल ( कोमल पलव) हेच ज्याचे हात आहेत व भ्रमर हेच ज्याचे नेत्र आहेत अशा मजिन्यानी ज्याचा आश्रय केला आहे, नानाप्रकारच्या पुष्पापासून उडणारा पिवळा परागसघ व मजिन्या याच्या योगाने जो इद्रधनुष्य व विद्यन यानी युक्त असलेल्या मेघाप्रमाणे दिसत आहे, शाग्वारूपी सहस्र बाहनी युक्त असलेला, अतरि- आम व्यापून रहाणारा, व चद्र-सूर्यरूपी दोन कुडलानी विराजमान होणारा जो, विश्वरूप दाखविणा-या विष्णप्रमाणेच, स्थित आहे अशा एका विशाल कटब वृक्षास दायराने पाहिले ज्याच्या मुळाशी मोटा हत्ती रहात असे. त्याचा मध्यभाग लतापप्पमय होता. त्यामुळे दिगाज व तारागण यानी युक्त असलेल्या ब्रह्माडोदराप्रमाणे ना दिसत होता. राघवा, त्या वृक्षाचे वर्णन करावे तितके थोडेच होणार आहे. भूतलाप्रमाणे त्याचा सर्व भाग पशु, पक्षी, कीट इन्याठिकानी व्याप्त झाला होता. तो मजिऱ्या ह्याच पताका व लता हे मडप यानी भूपित झाला होता, नानाप्रकारच्या पक्ष्याच्या ध्वनींनी तो गजबजून गेला होता. त्याच्यावर पुष्कळ पक्षी संचार करीत होते. ते एक सर्व वनदेवीचें अत:पुरच होते भगवान् विष्णु जसा आपल्या पार्षदानी वेष्टित असतो त्याप्रमाणे तो नाना- प्रकारच्या पक्ष्यानीं भावत होता. पुष्पगुच्छ याच चंचल अंगुलींनी, वन.