पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ४९. नंतर त्याने आपल्याच कल्पनेनें-वृक्षाचे अन चांगलें शुद्ध आहे व तेथेच माझी स्थिति होणे उचित होय. यास्तव पक्ष्यांप्रमाणे वृक्षांच्या शाखावर व टाळ्यांवर माझी गति व्हावी व तेथे मला सुखाने रहाता यावे म्हणून मी आता उग्र तप करतों-असे ठरविले व लागलाच एका कुंडांत यथाविधि उत्तम अग्नि पेटवून त्यात तो आपल्या खाद्याच्या मांसाचा होम करू लागला. तेव्हां अग्नीला मोठी चिता लागली. तो मनात म्हणाला "देवाचे मी मुख आहे. यास्तव जळलेल्या या ब्राह्मणमासाने देवाचे कंठदेश भस्म न होवोत, म्हणजे झाले " असा विचार करून भगवान् आग्निदेव, बृह. स्पतीच्या पुढे जसा सूर्य तसा, त्याच्यापुढे उभा राहिला व त्याला बोलला "हे कुमारा, कोशातून जसा उत्तम मणि काढून घेतात त्याप्रमाणे तुला इष्ट असेल तो वर मागून घे." रामा, सतुष्ट झालेल्या अग्नीचे हे म्हणणे ऐकून विप्रपुत्रही आनदिन झाला व पुष्पमिश्रित सुदर अर्ध्याने अग्नीची पूजा करून व पुष्कळ स्तुति करून म्हणाला " भगवन् , प्राण्यानी भरलेल्या या भूमीवर मला पवित्र स्थान मिळत नाही. यास्तव मला वृक्षाच्या अग्रभागी रहाता यावे, अशी इच्छा आहे" मुनिपुत्राने असा वर मागितला असता सर्व देवाचे मुख असा अग्नि तथास्तु' असे बोलून गुप्त झाला. इष्ट वर मिळाल्यामुळे दाशूरालाही मोठा आनद झाला व त्या कारणाने त्याच्या मुखावर चद्र व कमल यानाही तुच्छ करून सोडणारे उत्तम व रम्य तेज पसरले ४८. सर्ग ४९--शाखा, पल्लव, पुष्पसमूह, फळभर पक्षी इत्यादिकाच्या योगाने मनोहर झालेल्या कदबाचे उत्प्रेक्षादि अलकारांनी वर्णन श्रीवसिष्ठ-नंतर जो अरण्याच्या मध्यभागी असून, मेघमंडलास स्पर्श करीत आहे, मध्याह्नसमयीं खिन्न झालेले सूर्याचे घोडे ज्याच्या शाखेचा आश्रय करीत असतात, जो आपल्या शाखारूपी बाहूंनी दिशांच्या दीर्घ कुक्षीस जणु काय आच्छादितच करीत असतो, जो फुललेल्या पुष्परूपी नेत्रांनी आपल्या बाहूंनी आच्छादित न झालेला, असा काही दिशाचा भाग राहिला आहे की काय ? म्हणूनच पहात आहे, वाऱ्याच्या योगाने ज्यांच्या अंगावरील धूळ उडून गेली आहे व त्यामुळे जे काळे भोर दिसत आहेत अशा भ्रमण करणान्या असख्य भ्रमररूपी दिशांच्या मुखावरील केसांस जो आपल्या पल्लवरूपी तळहातानी मागे करीत आहे,