Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१११ बृहद्योगवासिष्ठसार. पर्वतावर एक दाशूर या नांवाचा महातपस्वी व परम धार्मिक मुनि रहात असे. तो विरक्त महामति एका कदंब वृक्षावर राही. श्रीराम-हे भगवन् , तो तपस्वी कोणत्या हेतूने अरण्यांत गेला व कदंब वृक्षावर कसा राहूं लागला ? श्रीवसिष्ठ-रामा, शरलोमा म्हणून त्याचा विख्यात पिता असून ब्रह्मदेवासारखा तो महात्मा त्याच पर्वतावर रहात होता. देवगुरूच्या कचा- सारखा त्याला हा एकच पुत्र झाला. त्यासह त्याने आपले जीवित वनात घालविले. नतर एकदा पक्षी घरटे सोडून जसा जातो, त्याप्रमाणे शर- लोमा पुष्कळ दिवस भोग भोगल्यावर शरीर सोडून स्वर्गलोकी गेला. तेव्हा त्या वनात एकटाच दाशूर मरण पावलेल्या पित्याकरिता रडूं लागला. हेमत- ऋतूत कमलें जैशी म्लान होतात, त्याप्रमाणे माता-पितृवियोगजन्य शोकानें सतप्त झालेला तो म्लान झाला. तेव्हा हा बालक अति दीन झाला आहे असें जाणून, राघवा, एका दयाळू वनदेवतेनें अदृश्य राहूनच त्याचे असें समाधान केलें.-हे महाबुद्धिमान् ऋषिपुत्रा, तूं असा अज्ञासारखा रडतोस कां ? ससाराचे चचल स्वरूप तूं कसें जाणत नाहींस ? साधो, ससति अशीच सदा चल असते हिन्यामध्ये प्राणी उत्पन्न होतात, मागून जिवंत रहातात व शेवटी अवश्य मरतात. या व्यवहारात ब्रह्मादि-स्तंब. पर्यत जे जे काही आहे तें तें सर्व नाश पावणार, यात संशय नाही. यास्तव पित्याच्या मरणाविषयीं तू व्यर्थ शोक करू नकोस. सूर्या. प्रमाणे, उदय पावलेल्या प्रत्येकाचा अस्त होणारच. राघवा, वनदेवतेची ही वाणी ऐकून ज्याचे नेत्र रडून लाल झाले होते. अशा दाशूराने धैर्य धरलें तो डोळे पुमून उठला. त्याने मोठ्या आदराने पित्याचे आवश्यक अत्य कृत्य केलें व उत्तम सिद्धीकरिता उत्तम तप कर- ण्याचा त्याने निश्चय केला. ब्राह्मण-कर्माने अरण्यात तप करणान्या त्याला शुद्धि, अशुद्धि, विधि-निषेध इत्यादि कल्पनाचे ज्यात प्राचुर्य आहे, असे श्रोत्रियत्व ( म्हणजे वेदाध्ययन, त्याच्या अर्थाचा विचार इत्यादि अनुष्ठा- नाची निष्ठा ) प्राप्त झाले. पण ज्याच्या बुद्धीला ज्ञेय तत्त्व ( ब्रह्म) कळलेलें नाही, अशा त्या श्रीत्रियाच्या मनाला, पवित्र पृथ्वीच्या पाठीवरही, शुद्धि- अशुद्धि इत्यादि कल्पनामुळे शांति मिळाली नाही. हे सर्वच भूतल भति शुद्ध असतानाही तें अशुद्ध आहे, असे समजून त्याला कोठेच चैन पडेना.