पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ४८. ६१५ नसतात ते 'मम' या अभिमानास कारण होणारी बाह्य व 'अह' या अभि- मानास कारण होणारी आतर अशा दोन्ही जगन्मायांना हातातील बेल- फळाप्रमाणे साक्षात् पहातात. नंतर ती जगत्संबधी माया तुच्छ आहे, असे जाणून ते विचारी जीव तिचा त्याग करितात. त्यानतर त्यांच्या चित्तात पूर्ण विरक्ति वाणते, आणि त्यामुळे भाजलेले बीज शेतात कितीही दिवस जरी असले तरी त्यापासून जसा अकुर उद्भवत नाही, त्याप्रमाणे ते ज्ञानी विरक्त पुरुप पुनः जन्म घेत नाहीत. अज्ञ पुरुष आधिव्याधीनी भरलेल्या व उद्या किवा आज नाश पावणान्या शरीराक- रिता सर्व उद्यम करीत असतात. आत्म्याकरिता मुळीच उद्यम करीत नाहीत. पण रामा, तू तरी, अज्ञासारखा, शरीर व मन यासच प्रसन्न करण्यात गुतू नकोस. तर केवल आ मपरायण हो. श्रीराम-गुरुवर्य, आपण मला दाशूराची भाख्यायिका सागता ना ? श्रीवसिष्ठ-होय. तुझी ऐकण्याची इच्छा असल्यास सागतो. जगन्माया-स्वरूपाचे वर्णन करण्याच्या मिपाने मी सागत असलेली ही कथा ऐक. या भूपृष्टावर ज्याच्यामध्ये असख्य विचित्र फुलझाडे आहेत, असा मागध नावाचा श्रीमान् व प्रख्यात देश आहे. तेथील अरण्यात कदंब वृक्ष फार असतात. विचित्र पक्षिसमूहाच्या योगाने तो देश सर्वाश्चर्य-मनोहर झाला आहे. त्यातील प्रत्येक गावाच्या सीमेवर पुष्कळ कोवळे गवत व दाट शेतें उगवलेली अससात. प्रायः सर्व नगरे उपवनानी रमणीय झालेली असतात. कमल, उत्पल, कहार इत्यादि नानाप्रकारच्या फुलझाडानी त्यातील सरोवराची तीरे भरलेली अस- तात. उद्यानात बाधलेल्या झोपाळ्यावर बसून विलासिनी स्त्रिया गाणी गातात व विलासी जन कामदेवाच्या बाणानी जर्जर न होण्याकरिता, शय्या, भूपणे इत्यादिकामध्ये सुवासिक व कोमल पुष्पाचा उपयोग करून, त्यास म्लान करीत असतात. असो, अशा प्रकारच्या त्या देशात एक उत्तम पर्वत असून त्यावर 'नानाप्रकारचे वृक्ष, कदलीवने, फुलझाडे, लहानमोठी सरोवरे, अनेक जलचर व स्थलचर प्राणी इत्यादि रम्य पदार्थाची समृद्धि होती. त्या पुण्य