पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६१४ बृहद्योगवासिष्ठसार. समुद्र व पुनः पर्वत. अनेक खिडक्या व साणी यांनी युक्त असलेल्या गृहात एकच सूर्यप्रभा जशी नानारूपाने पसरते, त्याप्रमाणे अनेक ब्रह्मांड-युक्त सृष्टीत एकच ब्रह्म-सत्ता पुनः पुनः विचित्र जगाच्या रूपान उद्भवते. पुनः दैत्य, पुनः देव, पुनः लोकातरक्रम, पुनः स्वर्ग-मोक्ष-इच्छा, पुनः इद्र, पुनः चद्र, पुनः नारायण देव व पुनः दनुज उद्भवतात. सुमेरु पर्वत ही जिची कर्णिका आहे व सह्य पर्वत हे जिचे केसर आहे, अशा प्रकारची ही पूर्ण व जिचा मध्यभाग विशाल आहे, अशी द्यावा-पृथ्वीरूपी नलिनी पुनः उत्पन्न होते. आकाशरूपी अरण्याचे आक्रमण करून व किरणरूपी नखे बाहेर काढून हा भास्कर-सिह अधकाररूपी हत्तीचे गडस्थळ फोडण्याकरिता पुनः पुनः उदय पावतो. पुन. पुनः हा चंद्रमा हालणा-या स्वच्छ मजिन्यां- सारख्या सुंदर करानी (किरणानी अथवा हातानी ), दिशारूपी स्त्रीचे जणुं काय मुखमडणच, असें माहादायी अमृत सपादन करतो. पुनः पुनः स्वर्गरूपी वृक्षावरून पुण्यक्षयरूपी वायूनें हालविल्यामुळे स्वर्गस्य जनरूपी पुष्पाच्या राशी खाली पडतात, कालसज्ञक पक्षी कार्य व क्रिया याच दोन पखांच्या योगाने काही वेळ ससारारम ही फडफड करून पुनः पुनः जातो. पहिल्या इद्रमज्ञक क्षुद्र भ्रमराचा अधिकार-काल सपला असतां तो जाऊन स्वर्गकमलावर दुसरा इद्र-भ्रमर येऊन बसतो. कृतयुगाने पवित्र केलेल्या वस्तृना कलि ( अधर्म ) पुनः पुनः मलिन करतो. कालसजक कुभाराने ज्याच्यावर प्राणिरूपी मडकी घडवून घेतली आहेत. असे हे कल्पनावाचे चाक पुनः पुनः वेगाने सतत भ्रमण करीत रहाते. तेव्हा हे रामा, दीर्घ भ्रम अशा या महामाया-आडबरामध्ये सत्य व अमन्य याचा निर्णय कसा करावा ? अथवा यात सन्यामत्य निर्णय करण्यासारखें काय आहे ? ही समार-परपर। दागन्या आख्यायिक प्रमाण कल्पनारचित व वस्तुशून्य आहे ४७. सर्ग ४८-भांगन्छेची निंदा, दाशगचा जन्म व प्रमन झालेल्या अर्मापासून त्याला मिळालेला वर. श्रीवसिष्ठ--पण रामा, संसारचक्र जरी कल्पनामात्र असले व ब्रह्मच जरी तत्त्वतः असले तरी मोठमोठे बुद्धिमानही त्याला जाणत नाहीत. कारण त्याना त्याची अपेक्षा वाटत नाही. शिवाय ते विषयभोग, ऐश्वर्य इत्यादिकामध्ये गढून गेलेले असतात. परंतु जे महात्मे इंद्रियान्या अधीन