पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ४७. प्रभाति जाती( जन्मां)चे वर्णन करण्याकरितां मी हा सृष्टिक्रम तुला सांगितला. मन जोपर्यंत समूळ नाहीसे झाले नाही तोपर्यंत पुनः सृष्टि, पुनः नाश, पुनः दुःख, पुनः सुख, पुनः अज्ञ, पुनः तज्ज्ञ, पुनः बंधदृष्टि, पुनः मोक्षदृष्टि, भूत, वर्तमान व भविष्यत्-विषयाविषयी पुनः प्रेम व पुनः अप्रेम इत्यादि चक्र एकसारखें चाललेले असते. दीप व ब्रह्मदेव यांच्या उत्पत्ति-नाशामध्ये कालाच्या न्यूनाधिकतेवाचून दुसरा कोणत्याही प्रका- रचा भेद नाही. कृत, त्रेता, द्वापर व कलि ही युगेंही वारंवार येत व जात असतात. मन्वतराचे आरभ, कल्पाची परंपरा, कार्यदशा, दिवस- रात्र, प्रकाश-अधकार, इत्यादि हे सर्व पुनः पुनः परिवर्तन पावत असते. तापवून लाल केलेल्या लोखडाच्या गोळ्यामध्ये त्याला घणाने ठोकण्या- पूर्वी जसे अग्निकण असतात, त्याप्रमाणे चिदाकाशामध्ये स्वभावतःच सदा हे सर्व भाव स्थित असतात. वृक्षातील पुष्प-फळाप्रमाणे परतत्त्वामध्ये हे कदाचित् अव्यक्त असते व केव्हा व्यक्त होते. चैतन्यविवर्तच हे सर्व आहे. सर्व सृष्टिदृष्टी चित्-पासून उद्भवतात. पण, रामा, हा संसार कधीही सत् नव्हे. कारण सर्व शक्तिमान् परमात्म्यामध्ये परमार्थतः असंसारस्वभावता आहे. त्याचप्रमाणे हे जग असें नाही, असेंही नव्हे. कारण त्या सर्व शक्तिमानामध्ये ससारशक्तिताही असते. ज्ञानी हे सर्व ब्रह्म आहे असें जाणतो. म्हणून त्याच्या दृष्टीने ससार नाही, असे म्हणणे युक्तच आहे. त्याचप्रमाणे अज्ञांना हा संसार असाच अखड भासत असल्याकारणाने त्याच्या दृष्टीने तो सत्यही आहे. जग पुनः पुनः तसेच होत असल्यामुळे हे असेच आहे, प्रवाहरू- पाने नित्य आहे, म्हणून जें मीमांसकादि कित्येक म्हणतात तें कांहीं खोटें नव्हे. अज्ञाच्या दृष्टी विचित्र असल्यामुळे बुद्धादिकांनी आपापल्या प्रक्रियेच्या निर्वाहाकरिता केलेल्या क्षणिक परमाणु, क्षणिक विज्ञान, शून्य इत्यादि कल्पनाही त्याच्या त्यांच्या दृष्टीने बरोबर आहेत. या एक सर्वव्यापि मात्म्यामध्ये त्याच्या करिपत अर्थापैकी अनुपपन्न असे काही नाही आणि खरोखरच जर काही अनुपपन्न (अयुक्त ) असेल तर हे सर्व संकल्प- जालच अनुपपन्न आहे. सारांश, हे सर्व असेंच पुनः पुनः होत असते. पुनः जन्म, पुनः मरण पुनः सुख, पुनः करण व कर्म, पुनः त्याच दिशा, पुनः आकाश, पुनः