पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६१२ बृहद्योगवासिष्ठसार. त्याच्यापासून ब्रह्मा. निपजतो. कधी कधी तर तेज प्रथम होते व त्याच्यापासून होणारा ब्रह्मा तैजस प्रजापति हे नांव धारण करतो. जल व पृथ्वी यांच्या विषयीही असेंच जाणावें. पांच भूतांतील कोणतेही एक भूत इतर चार भूतास निर्बल करून स्वतः वाढते व त्याच्यापासून झालेला ब्रह्मा त्याच्या पुढची सृष्टिक्रिया करतो. सर्व प्रजापती पचभूतांची कार्ये आहेत. तरी त्यांतील ज्या मुख्य भूतापासून जो होतो त्याला आकाशज, वायुज, तैजस आपव व पार्थिव अशी नावे प्राप्त होतात. नंतर त्याच्या देहावयवांपासून सर्व ब्राह्मणादि विषयमय सृष्टी उत्पन्न होते. या नारायणसंज्ञक देवाच्या नाभीपासून कदाचित् कमल उद्भवते. त्यात ब्रह्मा होतो-तोच पद्मज होय. तोही स्वसंकल्पाने असंख्य पदार्थ निर्मितो-पण हे सर्व कसे होते व काय होते ते काही कळत नाही. कारण ही सर्व देवाची माया आहे. त्याच्या त्या मचित्य शक्तीने हे सर्व आपोआप होते. त्यात कोणताही एक नियम नाहीं अथवा व्यवस्था नाही. सर्व मनोराज्याचा खेळ. विद्यमान पुरुषाचा जन्म नाभीमध्ये सभवत नाही. म्हणून जर म्हणावें तर या असग व अद्वितीय ब्रह्मामध्ये सद्वितीय जग तरी कसे सभवते? साराश या जगाच्या विचित्र उत्पत्तीसंबंधाने हे कसें झालें ? असे कसे होईल ? इत्यादि विचारीत बसणे म्हणजे बालकाने मनोराज्याच्या योगानें कल्पिलेल्या वस्तूंविषयी प्रश्न करण्यासारखेच अप्रयोजक आहे. मनामध्ये व्यक्त झालेल्या परमात्म्याच्या अचिंत्य शक्तीच्या योगाने सर्व अघटितही सुघट होते. सर्व चमत्कार भाहे. त्यात नियमाचा गंधही नाही. कदाचित् शुद्ध भाकाशात मनस्तत्त्व उद्भवतें. कदाचित् सुवर्ण-अड व त्यातील ब्रह्मगर्भ उत्पन्न होतो. कदाचित् पुरुष जलामध्ये वीर्य सोडतो आणि त्याच्यापासून कमल अथवा मोठे ब्रह्मांड उद्भवते. त्यांत ब्रह्मा निपजतो. कदाचित् पूर्वकल्पातील सूर्य या कल्पांत ब्रह्मा होतो. कदाचित् वरुण अथवा वायुही अडज बनतो. प्रत्यगाल्यामध्ये अशा या अत्यंत असत् व अति विचित्र सृष्टी उत्पन्न होतात. रामा, अशा प्रकारच्या विविध विचित्र सृष्टी ब्रह्मापासून उद्भनल्या आहेत. दृष्टाता- करितां म्हणून त्यांतील एका सृष्टीच्या प्रजापतीची उत्पति मी तुला सांगि- तली. पण त्याविषयी नियम मुळीच नाही. संसार म्हणून आपण ज्याला समजतो तो शुद्ध मनोविलास आहे. पण तुला बोध व्हावा म्हणुन हा सृष्टिक्रम सांगितला. याच न्यायाने व रीतीने उत्पन झालेल्या साखिकी-