पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० बृहद्योगवासिष्ठसार. प्रबल आहे. या पौरुषाच्या योगाने सर्व पुरुषार्थ प्राप्त होतात. शास्त्राने जसे विधान केले असेल त्याप्रमाणे आचरण करणाऱ्या अधिकारी पुरुषास सर्व पुरुषार्थ प्रवृत्तीमुळेच प्राप्त होतात. काळा, लाल, पाढरा, इत्यादि रग जसे प्रकाशावाचून स्पष्ट दिसत नाहीत त्याप्रमाणे पुरुषार्थ प्रवृत्तीवाचून सिद्ध होत नाहीत यास्तव शास्त्रीय प्रवृत्ति सर्व सुखाचे कारण आहे, हे तू विसरू नकोस. शास्त्रीय विधींचे उल्लंघन करून मन मानेल तसे वर्तन करणारे पुरुप नानाप्रकारचे कष्ट भोगितात. शाति हा अलौकिक पदार्थ त्यास पारखा होतो. ईश्वराने जरी हे मायिक जग निर्मिले आहे, तरी त्याच्या स्थितीकरिता काही अबाधित नियमही केले आहेत. जो शास्त्रीय व्यवहार करितो त्यास सुख हे फल मिळावे व जो अशास्त्रीय व्यवहार करितो त्यास दुःख हे फल मिळावे, हाही एक त्याती- लच अबाधित नियम आहे दैवावर विश्वास ठेवणाऱ्या सज्जनासही आमची एवढीच पृच्छा आहे की, बाबानो, या मृगजळाच्या मागे उगीच का लागता ? फल देण्याच्या अवस्थेत आलेले प्राक्तन कर्म व दैव यात काही भेद नसताना का प्रकारच्या प्रयत्नासच दैव हे नाव देऊन व्यर्थ का फमता व दुसऱ्याना का फसविता ? हे तुमचे काल्पनिक देव वरील नियमास बाध करू शकत नाही. असो, या दोन प्रकारच्या पौरुषातील शास्त्रीय पौरुषाचे परम पुरुषार्थ हे फल मिळते व अशास्त्रीय पौरुपाचे अनर्थ हे फल प्राप्त होते. प्राक्तन व वर्तमान पौरुष हे दोन मत्त बकरे आहेत ते आपापले फळ देण्याकरिता, दुसऱ्यास हटविण्याचा प्रयत्न एकसारिखा करीत असतात त्याच्या या लढायांत अधिक बलवान् असेल त्याचा विजय होतो. कधी कधी दोघा. चीही बरोबरी होते पण येथे एक गोष्ट ध्यानात ठवण्यासारखी आहे. ती ही की, प्राक्तन पौरुपाची वाढ खुटलेली असते. त्यास अधिक पुष्टि किवा अधिक बल येणे शक्य नसते. वर्तमान पौरुषाची गति कुठित झालेली नसते. शुभ किवा अशुभ प्रवृत्तीच्या योगाने त्यास पाहिजे तितके बलाढ्य किया अत्यत दुर्बल करिता येते प्राक्तनाने पौरुपाचा कदा- चित् पराजय केल्यास शास्त्रीय मार्गाने प्रवृत्ति करून पौरुषास बलाढय करावे. म्हणजे त्याच्या शत्रूचा नाश होण्यास विलब लागणार नाही. वर्तमान पौरुपास पुष्ट होण्यास जरी बराच अवकाश लागला तरी प्राक्तन कोणत्याही रीतीने पुष्ट होणे शक्य नसल्यामुळे त्याची भीति बाळगू नये.