पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ४७. ६११ असेल असें अनुमान कर. त्यांतील कित्येकांत एकेक किंवा दोन दोन सूर्यासारखे तेजोगोल असतात आणि कित्येक प्रकाशरहित असतात. या ब्रह्मतत्त्वमहा-आकाशात अनेक जगें समुद्रातील लाटांप्रमाणे उत्पन्न होतात व नाश पावतात. जलाशयातील तरग, माळ जमिनीवरील मृगजळ अथवा आमृवृक्षावरील केसरे यांप्रमाणे परब्रह्मामध्ये जगच्छोभा उत्पन्न होतात. सूर्याच्या किरणांतील त्रसरेणूही मोजता येतील, पण ब्रह्मातील जगाची गणना करितां येणार नाही. वर्षादि-ऋतूंमध्ये मशकादि किडे जसे वारंवार उत्पन्न होऊन नाश पावतात, त्याप्रमाणे या लोकसृष्टी वारंवार उत्पन्न होऊन नाश पावतात. पण त्या अशा केव्हापासून होत आहेत ते काही कळत नाही. पहिल्या तरंगापासून पुढचा तरग, त्याच्यापासून त्याच्यापुढचा अशी जलशयातील तरगाची परपरा जशी लागते त्याप्रमाणे या सृष्टींची परपरा लागलेली असते. ही सृष्टि पूर्वीच्या सृष्टीपासून झाली आहे. पूर्वीची तिच्याही पूर्वीच्या सृष्टीपासून झाली आहे. एवढेच फार तर हिच्याविषयी सागता येईल. पण या परपरेचा अगदी मूळ आरभ कोठन झाला आहे हे, तरगाच्या आरभाप्रमाणेच, सागता येत नाही. सृष्टि-परंपरा अनादि आहे. देव, असुर, मानव इत्यादि सर्व प्राणिसमूह पुनः पुनः होऊन मरण पावतात एका सवत्सरात क्षीण होणान्या सहस्रावधि घटिकां- प्रमाणे आजपर्यंत अनेक ब्रह्माड-पंक्ती नाश पावल्या आहेत. रामा, लीलेच्या आख्यानात सागितल्याप्रमाणे सर्व ब्रह्मांडाची कल्पना हृदयाकाशस्थ ब्रह्माडामध्येच होते. मातीच्या राशीतील घटांप्रमाणे. व अंकुरातील पल्ल्वाप्रमाणे पुढे होणाऱ्या जगत्परपरा ब्रह्मामध्ये राहतात. तत्त्वज्ञानाच्या योगाने पाहू लागले असता, या त्रिभुवनशोभा मिथ्या आहेत. असे समजेपर्यंतच त्या ब्रह्मचिदाकाशात राहतात. त्या सर्व चित्रासारख्या खोट्या आहेत. तत्त्वज्ञाच्या दृष्टीने सर्व सृष्टी, जलापासून होणाऱ्या दृष्टीप्रमाणे देवापासून होतात. म्हणूनच त्या आपल्या कारणाहून निराळ्या नाहीत. पण अतत्त्वज्ञाच्या दृष्टीने मेघांतून होणाऱ्या वृष्टीप्रमाणे त्या तटस्थ ईश्वरापासून हातात. अव्याकृत आकाशापासून झालेल्या भूतसूक्ष्मसंज्ञक ( पंचतन्मात्र- रूप) मायामळरूपी सूत्रात सर्व स्थूल (देहादि) व सूक्ष्म (इद्रियादि) भाव ओवलेले आहेत. केव्हा केव्हा प्रथम आकाश होते व त्याच्यापासून ब्रह्मा निपजतो. तोच आकाशज प्रजापति आहे. कदाचित् वायु प्रथम होतो व