पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार आनदानें सचार करतात. राघवा, तूंही या विस्तृत विचाराने संपन्न झाला आहेस. हे सुंदर राजपुत्रा, स्वाभाविक बुद्धिबलानेच तुझ्यामध्ये हे सर्व उत्तम गुण आले आहेत. यास्तव आत्मदृष्टीचा भाश्रय करून मान व मत्सर यांनी रहित हो व या भूलोकी विहार कर; म्हणजे तुला परम सिद्धि मिळेल. स्वस्थ व निरिच्छ हो. विषयांचे कौतुक पहाण्याची इच्छा सोड. चित्तात अति शीतल हो आणि मग तू या संसारांत खुशाल विहार कर.. श्रीवाल्मीकि-शुद्धचित्त मुनीच्या या निर्मल वाणीने राम तत्काल निर्मल झारल्यासारखा भासू लागला व मधुर ज्ञानामृताने विराजमान झालेला तो पूर्णचन्द्राप्रमाणे शीतल झाला ४६. सर्ग ४७- होऊन गेलेल्या व पुढे होणान्या असंख्य ब्रह्मादिकाचे वर्णन. श्रीराम-भगवन, आपली ही उदार, मधुर, अर्थपूर्ण, तात्त्विक व शुद्ध वाणी कितीही ऐकली तरी मनाची तृप्ति होत नाही. राजस-सात्त्विकी जाती सागत असताना प्रसगोपात्त ब्रह्मदेवाची उत्पत्ति आपण शास्त्रप्रमा- णतः सागितलीत ती मी ऐकली. आता पुढील भाग सागा. श्रीवसिष्ठ- राघवा, आजपर्यत लक्षावधि ब्रह्मदेव, शकर, इंद्र व नारा- यण होऊन गेले आहेत. दुस-या अनेक व याही विचित्र ब्रह्माडात नाना आचार व विहार यानी युक्त असलेली देव, असुर इत्यादिकाची अनेक शरीरे मागे झाली आहेत, साप्रत कालीं आहेत व पुढे होणार आहेत. निरनिराळ्या ब्रह्माडात ब्रह्मदेवादि देवाच्या उत्पत्ती नानाप्रकाराने होतात. त्याच्याविषयी एकच नियम नाही. केव्हा सर्व सृष्टी शंकरापासून होतात, केव्हा ब्रह्मदेवापासून होतात. कधी कधी भगवान् विष्णूपासून होतात. कधी त्यास मनी निर्माण करतात. कधी (पाप्रकल्पात ) ब्रह्मदेव कम- लापासून होतो. केव्हा केव्हा ( आपवसंज्ञक कल्पात ) जलापासून होतो. कधी तर अंड्यापासून हिरण्यगर्भ निपजतो. एकाद्या ब्रह्माडात शकरच सूर्य असतो. एकाद्यात इद्र किवा पुडरीकाक्षही सूर्य होतो. एकाद्या सृष्टीत भूमि दाट झाडानी भरलेली असते. एकाद्या सृष्टांत मानवानी भरलेली असते. कचित् ती पर्वतानी व्याप्त झालेली असते. एकादी भूमि मृत्ति- कामय असते. एकादी पापाणमयी असते. एकादी सुवर्णमयी व ताम्रमयी असते. फार दूर कशाला? या एकाच ब्रह्माडात किती आश्चर्ये भरली आहेत ती पहा व त्यावरून इतर ब्रह्माडातही तसेंच अचिंत्य आश्चर्य