पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ४६. चार गुणांचा तूं आश्रय कर. ज्या ज्ञानी पुरुषाची कमें करीत अस- तांनाही, इच्छा किवा अनिच्छा नसते, त्याची बुद्धि लिप्त होत नाही. इंद्रियांसह मन दर्शन, स्पर्श, श्रवण इत्यादि क्रिया करो अथवा न करो, तूं निरिच्छ व आत्मानुसंधानवान् रहा. 'माझे हे ' असे म्हणून तुझें मन इंद्रियांच्या विषयांमध्ये आसक्त न होवो. तुझ्या मनाला विषयश्री जेव्हां रुचेनाशी होईल, तेव्हा तूं ज्ञानसंपन्न व संसारसागरातून पार झाला आहेस, असे समज. समाधिकाली शरीराचे भान नसतांना व व्युत्थानसमयी शरीराचे भान असतांनाही ऐहिक व पारलौकिक विषयाारुचि वाढू लागली म्हणजे तुला इच्छा नसली तरी मुक्ति मिळेल.' रामा, पुष्पापासून जसा उदार गंध कौशल्याने पृथक् करून अत्तरांत आणतात, त्याप्रमाणे विवेकबुद्धीनें परम पदाकरिता वासनासमूहा- पासून तूं आपलें विरक्त चित्त पथक् कर. वासनाजलाने भर- लेल्या या अगाध संसारसागरात जे प्रज्ञारूपी नौकेवर आरूढ होतात, तेच पार जातात व बाकीचे सर्व त्यात बुडतात. वस्तन्याच्या धारेसारख्या तीक्षण व अति धीर बद्धीने आत्मतत्त्वाचा विचार करून स्वपदी प्रवेश कर, ज्ञानवृद्ध तत्त्वज्ञ जसा या प्रपंचात विहार करितात, त्या- प्रमाणेच तूंही व्यवहार कर. मूढाप्रमाणे व्यवहार करूं नको. नित्य तृप्त व महाबुद्धिमान अशा महात्म्या जीवन्मुक्ताच्या आचाराचे तूं अनुकरण कर. भोगाच्या आसक्तीने आपल्याला व दुसऱ्याना ठकविणान्या पामरांच्या आचरणाचे तू अनुकरण करूं नकोस. ब्रह्मतत्त्व व जगत्तत्त्व यास जाण- णारे जन जगातील व्यवहार सोडीत नाहीत व त्याची इच्छाही करीत नाहीत. तर जसा प्रसंग येईल तसे वागतात. विद्या, तप, पराक्रम इत्यादि उत्कर्ष; दक्षता, कुल, शील इत्यादि गुण, सपत्ति इत्यादि विषयांचे ठायीं, ते मिथ्या असल्यामुळे, पुरुषार्थाच्या निरुपयोगी आहेत, असें जाणणारे तत्त्वज्ञ लोलुप होत नाहीत. सर्वस्वाचा नाश झाला तरी ते खिन्न होत नाहीत. सर्व उपभोग-साधनानी सपन्न असलेल्या नदनवनादि देवांच्या विहारस्था- नीही ते आसक्त होत नाहीत व सूर्याप्रमाणे शास्त्रमर्यादा सोडीत नाहीत. ज्याची इच्छा पार निघून गेली आहे, असे ते महात्मे प्रसंगी प्राप्त होईल तो व्यवहार करतात. सारांश विज्ञान-सारथि, इंद्रियेंच अश्व व मन हेच लगाम यांनी युक्त असलेल्या देहरथांत स्वस्थपणे बसलेले ते प्रपंचांत मोठ्या ३९