पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. व स्त्रीप्रभृति इतर सुखसाधने यांचा नाश झाला तरी, दुःख कसे होणार! गंधर्व-नगरांतील एकादा पदार्थ दूषित किंवा भूषित झाला म्हणून त्यामुळे पहाणाराला जसें दुःख किंवा हर्ष होत नाही त्याप्रमाणे अविद्याविलासरूप पुत्रादिकाच्या उत्कर्षापकर्षामुळेही सुख-दुःख होणे युक्त नव्हे. मृगजळ कितीही जरी वाढले तरी जलाची इच्छा करणारांना जसा आनंद होत नाही तसा धनादिकांच्या वृद्धीचाही आनंद मानूं नये. उलट धन, पुत्र, परिवार इत्यादिकाची वृद्धि होऊ लागल्यास दुःखी होणेच युक्त आहे. कारण मोह-माया वाढल्यास आनदी होणे कधीच शहाणपणाचे नव्हे. मदा ज्या विविध विषयोपभोगामुळे राग वाढतो त्याच्याच योगाने सज्ञास विराग वाटतो. नश्वरस्वभाव विषयाविषयी हर्ष मानण्यास वस्तुतः अवकाशच नसतो. परिणामाकडे दृष्टि देणारे साधू त्यांच्या योगाने विरक्त होतात. यास्तव हे राघवा, तुंही तत्त्वज्ञाप्रमाणे व्यवहार करीत असतांना संसारातील जे जे नष्ट होईल त्याची त्याची उपेक्षा कर व जे जे प्राप्त होईल त्याचा त्याचा उपयोग कर. अप्राप्त भोगांची इच्छा न करणे व प्राप्त वस्तूंचा, आसक्त न होता, उपभोग घेणे हे पंडिताचें लक्षण आहे. आत्म्यास आच्छादित करून सोडणारा व म्हणूनच महा घातकी अशा या संसारसभ्रमात तू सावधपणे असा विहार कर की, ज्याच्या योगानें तूं मोहित होणार नाहीस. संसाराचे हे अवडबर मिथ्या आहे, असे ज्याना कळत नाही ते मुज्ञही नाश पावतात. हे जग मिथ्या आहे, किंवा ते अनर्थाचे कारण आहे अथवा तें परमार्थापासून भ्रष्ट करणारे आहे इत्यादिकांतील कोणत्याही एकाचा युक्तीनं ज्याची दृश्याविषयींची रति (आसक्ति ) पार नाहीशी झाली आहे त्यांची शुद्ध मति कोणत्याच मोहात निमग्न होत नाही. हे सर्व असत् आहे, असे समजल्यामुळे ज्याची आस्था कोणत्याही वस्तूमध्ये रहात नाही त्या सर्व बाला मिथ्या अविद्या कधीही स्पर्श करीत नाही. ज्याची बुद्धि मी व हे सर्व जग एकच असें जाणून व आस्था आणि अनास्था सोडून स्थिर रहाते तो मोहवश होत नाही. सत्व असत् यांमध्ये अनुवृत्त असलेले व सत्तामात्र अशा पदाचा स्वबुद्धीने अवलंब करून बाह्य व आभ्यंतर दृश तूं घेऊ किंवा सोडूं नकोस. अत्यंत उपरति (शांति ), संतोष, गृहार निवासस्थानावर हे माझे' असा अभिमान न ठेवणे व आसक्ति सोडणे ८