Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ४६. ६०७ करिता सुखी व दुःखी होणे उचित नव्हे. अत्यंत असत् व सत् वस्तूच्या नाशाप्रमाणेच त्यांची वृद्धिही असभवनीय आहे. यास्तव तिच्या करितां हर्ष करण्यासही फारसा अवकाश रहात नाही. तस्मात् असल्या या असत्य संसारांत ग्राह्य काय आहे, याचा विचार सुज्ञ पुरुष करोत. त्याचप्रमाणे सत्य ब्रह्मतत्त्वभूत त्रिभुवनात त्याज्य काय आहे याचाही निर्णय करून प्राज्ञ त्याचा त्याग करोत. जग ज्याला अत्यंत असत् वाटते किंवा जो त्याला अत्यत सत् समजतो त्याला मुख व दुःखही होत नाही. पण मूढ सत् व असत् याचे चमत्कारिक रीतीने मिश्रण करीत असल्यामुळे ज. गाच्या नाशानें तो दुःखी व बुद्धीने सुखी होतो. जे उत्पत्तीपूर्वी नसून नाशानंतरही नसते ते वर्तमान म्हणजे मध्य अवस्थेतही नसते. (म्हणजे तें असत् होय.) अशा असत् प्रपंचाची जो इच्छा करतो त्याला तोच मिळतो. पण आधी, अती व मध्य अवस्थेतही जें सत असते ते सर्व सादा सत्च होय. ज्याच्या दृष्टीने सर्व सत्च असते त्याची सदा आत्ताच अनुभवास येते. राघवा, जलात प्रतिबिबित झालेल्या चद्र, आकाशतल-इत्यादिकांप्रमाणे मसलभूत जगाची वाछा मूढ करितात. उत्तम पुरुष करीत नाहीत. मुढ अर्थशून्य सुखाभासानी, पुढे दुःखी होण्याकरिताच, सतुष्ट होतो. त्यास्तव दशरथतनया, तूं असा मूढ होऊ नकोस. यातील स्थिर वस्तूचा निश्चय करून त्या नित्याचाच आश्रय कर. मूढानी कल्पिलेल्या अहका- रासह हे सर्व जग असत् आहे असे मानून तूं राग व द्वेष याचा परिहार कर व पूर्वी सागितलेल्या तीन प्रकारच्या अहंकारातील ज्ञानी पुरुषांनी कल्पिलेल्या दोन प्रकारच्या अहकारासह हे सर्व सत् आहे अशी भावना करून तू हर्ष-शोकयुक्त होऊ नकोस. श्रीवाल्मीकि-वसिष्ठमुनि इतकें सांगत आहेत तों सूर्य अस्त पावला. व सभासद सायंतन अनुष्ठाने करण्याकरिता निघून गेले आणि रात्र संपतांच प्रातःकृत्ये आटोपून ते सर्व सूर्यकिरणाबरोबरच सभेत येऊन तिला सुशोभित करूं लागले ४५. येथे नववा दिवस समाप्त झाला. सर्ग ४६-ससारात विहार करीत असतानाही साधक ज्या गुणाच्या योगाने त्यात मम होत नाही ते जीवन्मुक्ताचे गुण. श्रीवसिष्ठ-हे सर्व इंद्रजाल आहे असे समजल्यावर, त्यांतील रम्य धन