पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. ब्रह्मदेवाचे शरीर मननानेच कसे झाले तें तूं पहा व त्यावरून त्याच्या मनाप्रमाणे आमच्या मनातही सर्वेश्वराची शक्ति आहे असें तं जाण. देव. दैत्य, मानव इत्यादि सर्व स्वसंकल्पापासून झाले आहेत. यास्तव स्वसकल्प शात झाला म्हणजे तेल सपलेल्या दिव्याप्रमाणे, सर्व शात होते. हे महाबुद्धे, जग दीर्घस्वप्न आहे असे तू निःशकपणे जाण. परमार्थतः यात कांही उत्पन्न होत नाही व यातील काही नाश पावत नाही. विवेक- दृष्टीने पाहिल्यास ब्रह्मादिकही मिध्या भासू लागतात. नौकेतून अथवा गाडीतून जाणाराना आजुबाजूचे वृक्ष चालत असल्याचा जमा भास होतो त्याप्रमाणे या शरीरपरपरेचा भास होतो. हे इंद्रजाल, मायिक, मनोमय व अनिवाच्य आहे. सर्व जग जर ब्रह्मच आहे तर त्यात अन्यतेला अवकाश कसा मिळणार ? हा पर्वत हा वृक्ष, ही गंगा, हा प्रपच इत्यादि भ्रम, मनाच्या दाढामुळे, सत्य आहे तसे वाटतात. विचारहीनाला हे जग प्रपचात पाडणारे आहे. यास्तव रामा, तू त्याला सोडून निष्प्रपंच आत्म्याची भावना कर. या दीर्घ स्वप्न सदृश जगाचा विस्तार मात्र फार मोठा दिसतो. पण घेऊ लागले अमत त्यातील काही हाताला मात्र लागत नाही. यास्तव आशा-भुजगाचा जणुं काय कोशच असे हे जगदाडबर तू सोड. त्यावर आसक्ति ठेवू नकोस. हे मृगजळ आहे, असे समजल्यावर कोणता शहाणा त्याच्या मागे धांवत जाणार आहे ? व जो मूढ त्या मनोरथमयी शोभेच्या मागे लागतो तो केवळ दुःखाचेच भाजन होतो. रामा, या सृष्टीत परमार्थतः सत्य वस्तु नसतीच व मग जर हे अनेक लोक अवस्तूच्या मागे लागते तर त्यात मोठासा दोष नव्हता. पण सत्-वस्तु असताना तिला सोडून असनच्या मागे लागणारास काय ह्मणावें ? रामा, जग नष्ट झाले तरी तुझं काही नष्ट होत नाही व ते समृद्ध झाले तरी तुझें स्वरूप समृद्ध होत नाही. जे मूळचेच असत् तें असत् शाले म्हणून तुझें काय जाते ? असत्चें नष्ट काय होणार ? व नाश पावण्यासारखेच जर त्यांत काही नाही तर दुःखाचे तरी कारण काय ? त्याचप्रमाणे जे अत्यत सत आहे त्यांचे काय नष्ट होणार ? व त्यांतील काही नष्ट झाल्यास ते अत्यंत सत् कसलें ! यास्तव ब्रह्म अत्यंत सत्य असल्यामुळे व जगही अमरूप असल्यामुळे त्याच्या भ्रामक वृद्धि-क्षया-