पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ४५० ६०५ स्वच्छ भागांनी निर्मिलेलें, कोव्यवधि रोमांनी व्याप्त, बत्तीस दातांनी शोमणारे, मांड्यांतील दोन व पाठीचा कणा या तीन खांबांनी सुदृढ, प्राणादि पांच वायुरूपी देवतांचे स्थान, हात, पाय, मस्तक, वक्षःस्थल, व कुशी या पांच विभागांनी-संपन्न, ज्याला नऊं द्वारे आहेत व में त्वचेने मढविलेले आहे असें, वीस अंगुली व वीस नखें योनी चिहत झालेलें आणि दोन हात, दोन स्तन, दोन नेत्र (कचित् अनेक नेत्र व अनेक भुजा ) यांनी युक्त असें हे-चित्तरूपी पक्ष्याचे घरटें, मदनरूपी भुजंगाचें बिळ, तृष्णारूपी पिशाचीचे घर, जीवरूपी सिंहाची गुहा, अभिमानरूपी गजाचे बंधनस्थान व मनोरूपी कमलाने सुशोभित झालेलें- रम्य शरीर ब्रह्मदेवाने पाहिले. नंतर तो त्रिकालज्ञ देव या अपार आकाशात प्रथम काय बरे झालेले असावे ? (म्हणजे माझ्या उत्पत्तीच्या पूर्वी काय बरे असावें ?) म्हणून विचार करू लागला. तेव्हा त्याला आपले मूळ काय आहे ते कळले. त्याला मार्गे होऊन गेलेले असंख्य सर्गसमूह दिसले. त्याला क्रमाने सर्व सांगोपाग धर्म व अधर्म समजले. वसंत जसा पुष्पांना धारण करतो त्याप्रमाणे त्याने वेदांचें धारण केलें. नतर वेदोक्त क्रमानेच विचित्र संकल्पशक्तीने सर्व प्रजा निर्माण केली. त्याच्या स्वर्ग- मोक्षाकरितां व धर्म, अर्थ आणि काम याच्या सिद्धीकरिता अनेक विचित्र शास्त्रे रचली व पदार्थ निर्माण केले. सारांश, रामा, याप्रमाणे विरिंचीच्या मनापासून ही सर्व सृष्टि उद्भवली आहे ४४. सर्ग ४५-मनाचे कार्य जग सत्य नाही, व सत् त्रिकाली सत्यच असते. श्रीवसिष्ठ-अशारीतीने हे जग जरी झाले आहे तरी ते वस्तुतः झालेले नाही. या एवढ्या मोठ्या आकाशरूपी ब्रह्माडानें देश व काल थोडे सुद्धां आवृत होत नाहीत. हे देहादि सर्व भुवनत्रय मनाने कल्पिलेलें आहे. पण दर्शनाचे कारण जसे नेत्र त्याप्रमाणे स्मृतीचे कारण मन आहे. यास्तव मनाने रचलेले सर्व स्मृतीसारखे आहे. स्मृतीचा विषय स्मृतिसमयीं सत् नसतो. (म्हणजे ज्याचे स्मरण होते तो पदार्थ, जेव्हां स्मरण होते, तेव्हां पुढे नसतो. प्रत्यक्ष दिसत नसतो.) चित्त-संकल्पाप्रमाणे होत नाही असे काही नाही. मनोगुहांचा आश्रय न करणान्या शक्ती जगदीश्वरामध्ये तरी कशा असणार ! व जरी असल्या तरी त्यांचा उपयोग काय ? सर्व शक्तिमान् विभूच्या सत्तेनेच सर्व पदार्थाची सत्ता व असत्ता सदा संभवते.