पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ४४. १.१ शरीरादि हे सर्व आभासमात्र असत् व स्वमतुल्य आहे. हे निष्पापा, हे दीर्घ स्वप्न व्यर्थ दिसत आहे. अज्ञाननिद्रा जाऊन व भावना गळून ज्याचे चित्त जागे झालेलें असतें तो संसारस्वप्नास पहात असला तरी परमार्थतः त्यास पहात नाही. पण जो अज्ञान-निद्रेतून जागा झालेला नसतो तो मोक्ष-पदप्राप्ति होई तो पुन. पुनः ससार करतो. पाण्यामध्ये जसा भोवरा, बीजामध्ये जसा अकुर, अकुरामध्ये जसा पल्लव, पल्लवामध्ये जसें फूल व फूलामध्ये जसें फळ त्याप्रमाणे जीवाचा कल्पना-मय देह मनात असतो. मातीचा गोळाच जसा घट होतो त्याप्रमाणे मनाचा सकल्पच देह बनतो. मन बहुरूप आहे हे खरे पण त्यात वासनारूपानें स्थित असलेल्या अनेक देहांतील जो एकच देह, परिपक्क झालेल्या कर्मामुळे, अभिव्यक्त होतो त्याचाच तो अनुभव घेतो, असा नियम आहे. त्यामुळे मनातील बीजरूप अनेक देह एकाच वेळी उद्भवत नाहीत. उत्तम कर्माचा परिपाक झालेला असल्यास मनही उत्तम देहरूप होते. आदि सर्गामध्ये याचा प्रथम देह उत्तम असतो. कारण त्यावेळी विभु ब्रह्मा आपल्या कमल- कोश-गहात राहिलेला असतो. नंतर त्याच्या संकल्प क्रमानेच ही अपार सष्टि उप्तन्न होते. __ श्रीराम-प्रभो, जीव मनःपदास (म्हणजे मनोरूपास ) प्राप्त होऊन ब्रह्मदेव-कसा झाला, ते मला सागा. श्रीवसिष्ठ-शूर राजतनया, ब्रह्मदेवाच्या शरीरमहाणाचा क्रम मी तुला थोडक्यात सागतो म्हणजे त्याच दृष्टाताने तू सर्व जगास्थति जाण- शील. दिशा, काल इत्यादिकांनी मर्यादित न झालेले आत्मतत्व स्वशक्तीने, लीलेनेच, जेव्हा मर्यादित रूपाची भावना करते तेव्हांच वासनावशात् तें जीवसज्ञेस पात्र होते. संकल्पोन्मुख झालेले तेंच चंचल मन होतें. पूर्व सर्गात 'हिरण्यगर्भच मी आहे ' अशा अहंग्रहोपासनेने संस्कारसंपन्न होऊन तसेंच प्रलयसमयी अव्याकृतात लीन झालेले मन हीच मनःशक्ति होय. ती पूर्वक्रमानेच आपल्या आविर्भावाची कल्पना करू लागली असता एका क्षणांत आकाशाची भावना करिते. ती स्वच्छ आकाशभावना शब्द- तन्मात्र व श्रोत्रंद्रिय होण्यास सज्ज असते. नंतर शब्दतन्मात्र व श्रोत्रंद्रिय- रूप असलेल्या आकाशाच्या रूपास प्राप्त होऊन वृद्धि पावलेले मन वायु- स्पंदाची भावना करितें. तो वायुस्पंद स्पर्शतन्मात्र व त्वग-इद्रियरूप असतो.