पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १३ ६०१ चांडाल, भिल्ल, इत्यादि अति नीच मानव योनीत उद्भवतात. कित्येक नाना प्रकारचे गवत, औषधी, फळे, मूळे, नानाप्रकारच्या लता, गुल्म, विविध पशू, पक्षी, नानाप्रकारचे लहान-मोठे किडे, इत्यादि निपजतात. त्यांतील कित्येक भापत्तींत पडलेले असतात. कित्येक सुख व संपत्ति यांचा अनुभव घेतात. कित्येक स्वर्गपुरात असतात. कित्येक भूलोकी येतात व बरेच नरकांत वास करितात. कित्येक नक्षत्रे होऊन रहातात. कित्येक वृक्षांच्या रध्रात निवास करितात. काही वायुरूप झालेले असतात. काही आकाशांत स्थित असतात. कित्येक सूर्य व चंद्र याच्या किरणात असतात. बहुतेक विषयलंपट झालेले असतात. काही कल्याणभाजन जीवन्मुक्त होऊन या लोकी भ्रमण करितात. काही फार दिवसांपासून मुक्त होऊन रहातात व कित्येक परमात्म्यामध्ये तादात्म्य पावतात, काही जीवाना थोड्याच दिवसांत मुक्ति मिळावयाची असते. काही भोगलपट जीव कैवल्याचा द्वेष करितात. काही विशाल दिग्देवता होतात. कित्येक महा वेगवाल्या नद्या होतात. कांहीं जीव स्त्रिया व काही नपुसक असतात. कित्येक अति बुद्धिमान् असतात. कित्येक जडमती असतात. कित्येक ज्ञानाचा उपदेश करणारे च कित्येक समाधि लावून बसलेले असतात. __ तात्पर्य हे रामभद्रा, याप्रमाणे हे सर्व जीव आपल्याच संसारविषयक चासनेमुळे परतंत्र होऊन अशा अनेक विचित्र अवस्थामध्ये पडलेले असतात. मृत्यु ज्याना आपल्या हाताने सतत उडवीत आहे अशा चेंडूप्रमाणेच हे सर्व वारंवार खाली, वर व तिरकस उडत असतात. एका वृक्षावरून दुसन्या वृक्षावर उडून जाणान्या पक्ष्याप्रमाणे आशापा- शानी बद्ध झालेले ते वासनाप्रमाणे एका शरीरातून दुसन्या शरीरांत, दुसन्यातून तिसन्यात इत्यादि प्रकारे फिरत रहातात. अनंत विषयां- विषयींच्या अनत कल्पनास उत्पन्न करणाऱ्या अविद्येच्या योगाने ते हे मोठे जगन्मय इंद्रजाल पसरतात. त मूढ आपल्या अनंत आत्म्याला जोपर्यंत पहात नाहीत तोपर्यंत पाण्यातील भोवऱ्याप्रमाणे ते संसारांतच भ्रमण करीत असतात. त्यांतील जे काही अभ्यास व वैराग्य यांच्या दृढते- मुळे आत्म्याला पहातात व असत् सोडतात ते पुनः या संसारांत उत्पन्न होत नाहीत. काही विवेकभ्रष्ट सहस्त्रावधि जन्म भोगूनही पुनः संसार- संकटांत पडतात. कित्येक उत्तम जन्म, उचित देश, काल, प्रतिमा,