पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६०० वृहद्योगवासिष्ठसार. मोठ्या प्रेमाने पडून मरतो. संसारात पुष्कळ भ्रमण करून थकलेलें त्याचे चित्त खुडलेल्या कमलाप्रमाणे म्लान होते. सारांश बा शुभ शिष्या, आपल्याच बंधाविषयी भास्था धरणारे मन घोर दुःखात पडले आहे. यास्तव हे देवतुल्य पराक्रमी रामा, मोठ्या धैर्याने तू त्याचा उद्धार कर. चि- खलात रुतलेल्या मत्त बैलाप्रमाणे मदनवश झालेल्या मनाला बलात्काराने वर काढ. त्याला स्वतंत्र कर. मन शुभ व अशुभ याच्या योगाने मलिन झालें आहे आणि जरा, मरण व दुःख याच्या योगाने मूछित झाले आहे, असें पाहूनही ज्याला खेद होत नाही व जो त्याला आपत्तींतून सोडवि- विण्याचा प्रयत्न करीत नाहीं तो या जगात नराकृति राक्षसच आहे ४२. सर्ग ४३-जीवाच्या कर्मगतींचे वर्णन, विवेकादि दुर्लभ असल्यामुळे मुक्ति फारच थोड्या लोकाना मिळते. श्रीवसिष्ठ-रामा, याप्रमाणे चित्-चे औपाधिक-भावरूप-जीव ससार- वासनेमुळे संसारप्रवाहात पडले आहेत. ज्याच्या ठिकाणी आकाराची कल्पना केली आहे अशा ब्रह्मापासून ते झाले आहेत. झज्यातून सतत निघणान्या असख्य जलबिंदूप्रमाणे आजपर्यंत असे अनेक जीव ब्रह्मापासून झाले आहेत; हल्ली होत आहेत व पुढे होतील. आपल्याच वासनामुळे आशाच्या अधीन झालेले ते सर्व विचित्र दशामध्ये पडतात. जलातील बुडबुड्याप्रमाणे ते सर्व दिशा व प्रदेश यातील जल व स्थल यांमध्ये सतत उत्पन्न होऊन मरत असतात. त्यातील कित्येकांचा या कल्पांत एकच जन्म झालेला असतो. कित्येकाचे शंभरापेक्षा अधिक झालेले असतात व कित्येकाचे असंख्य जन्म होऊन गेलेले असतात. कित्येकांचे जन्म पुढे व्हावयाचे असतात. कित्येकाची जन्मपरंपरा सपून ते शेवटच्या जन्माचा अनुभव घेत असतात. म्हणजे जीवन्मुक्त-अवस्थेत असतात. कित्येक अनेक कल्प एकाच योनीत, पुनः पुनः उत्पन्न होत, रहातात. कोणी दुसऱ्या योनीचा आश्रय करितात. काहीं नारक योनीतील जीव महादुःख भोगीत अस. तात. मानव अल्पसुखाचा स्वाद घेतात. काही देव होऊन पुष्कळ सुख भोगतात व कित्येक सत्यलोकी जातात. कित्येक गंधर्व, किनर, विद्याधर व महा उरग होतात. कित्येक सूर्य, इंद्र, वरुण, शंकर विष्णु ष ब्रह्मदेव होतात. काही कूष्मांड, वेताळ, यक्ष, राक्षस व पिशाच-योनीत उत्पन्न होतात. कित्येक ग्रामण, क्षत्रिय, वैश्य व शुद्ध होतात. कित्येक