पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ४२. १९७ असत् आहे व ब्रह्म मात्र सत् आहे, असा ज्याचा निश्चय असतो तो मोक्षाला पात्र होतो. अहो ही माया म्हणजे सर्व जगांतील जीवरूपी पक्ष्यांस बाधणारे जाळें माहे. पण जो जगाला स्वप्न समजतो व त्यांतील वस्तूमध्ये आसक्त होत नाही तो त्या दुःखरूप जाळ्यात अडकून पडत नाही. परंतु असले भव्य पुरुष थोडे. प्रायः सर्व प्राण्यांना इंद्रियादिकांस आत्मा सम- जण्याचीच फार दिवसांपासून संवय झालेली असल्यामुळे ते माया-जाळ्यात मग्न होऊन रहातात. अनात्म्यास आत्मा समजल्यामुळेच आत्मज्ञान दुर्लम झाले आहे. पराग्दृष्टी (बाह्यदृष्टी) मुळेच तत्त्वाविषयी संशय उत्पन्न होतात. पण असल्या मिथ्या शास्त्रार्थ ज्ञानाच्या योगानेही आत्मज्ञान सपा- दन केल्यावाचून या अविद्यानदीतून पार जाता येत नाही. तिच्या पार झाल्यावाचून आत्मज्ञान होत नाही व आत्मज्ञान झाल्यावाचून ते अक्षय पद प्राप्त होत नाही. ही मल देणारी अविद्या कोठून तरी व कशी तरी होऊन आत्मवस्तूच्या आश्रयानेच ती स्थित झाली आहे. यास्तव ती कोठून आली हा विचार करण्यात व्यर्थ काल न घालविता ही नाहींशी कशी होईल, मी हिला मारून कसे टाकीन याचा विचार कर. हिचा अस्त झाला, ही क्षीण झाली, म्हणजे ही कोणापासून झाली, कशी झाली, इत्यादि सर्व कळेल. वस्तुतः ही नाही. विवेकदृष्टीने पाहू लागले असता ही दिसत नाही. मग तिला सत्य जाणणे हे स्वप्नात पाहिलेल्या पुरुषाचे कुल, गोत्र, इत्यादिकांचा शोध करण्यासारखेच व्यर्थ नव्हे का? ही दुष्ट डाकीण दोषाकरिता उत्पन्न होऊन वाढली आहे. यास्तव, बा क्षत्रिया, तूं हिला बलात्काराने मारून टाक. म्हणजे तुला सर्व समजेल. या अविद्येने ज्याना परवश केले नाही असे अति शूर व महा प्राज्ञ पुरुष त्रिभुवनात अति विरळा. यास्तव या रोगशील मायेचा विनाश करण्याविषयीं यत्न कर. म्हणजे पुनः ही तुला जन्मदुःखामध्ये पाडणार नाही. सर्व आपत्तींची मुख्य सखी, अज्ञान वृक्षाची मजिरी व अनर्थसघाची जननी अशा या अविद्येचा तू समूळ उद्धार कर. आणि भवाणेवातून पार हो ४१. सर्ग ४२-अनंत चिच्छक्तीपासून वासनाक्रमाने जीवाचे अवतरण. श्रीवसिष्ठ-रामा, अतिशय वाढलेल्या व पहाताच नाश पावणान्या या अविद्यारूपी भयंकर व्याधीचे औषध मी भाधी सागतो. चाळिसान्या सर्गात 'राजस-सात्विकी जन्माचे वर्णन मी पुढे करीन' असे म्हटले