पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार श्रीवसिष्ठ-रामा, मी जें सांगत आहे ते अगदी यथार्थ व स्पष्ट सांगत आहे. त्यात दुर्बोधादि काही नाही. तुझी ज्ञानदृष्टि प्रसन्न झाली व प्रबोध- सूर्य स्पष्ट उदय पावला म्हणजे स्वस्थचित्त झालेल्या तुला माझ्या उपदे- शाचे रहस्य कळेल. उपदेश्याच्या उपदेशाकरितां भ्रमरूप वाक्यरचना योजलेली असते. यास्तव तूं पाक्यांतच गुरफटूं नकोस. त्यांच्यापासून ज्ञात होणान्या तत्त्वाकडे ध्यान दे. स्वप्नादि असत्य भावापासूनही पुढे होणाऱ्या सत्य गोष्टीचा बोध होतो. तुला वाक्यार्थ ज्ञानावरून अत्यंत निर्मल सत्य कळलें म्हणजे तू आपोआप शब्दार्थभेद सोडशील. वाक्प्रपंच असत् असला तरी त्यावाचून ज्ञान होऊन अज्ञान-तम जात नाही. वाणीचा विस्तार व तजन्य ज्ञान ही दोन्ही जरी अविद्येची कायें असली तरी बहु- जन्म-सचित पुण्यामुळे शुद्ध अंतःकरणाकार झालेली ती अविद्याच स्वहि- ताकरिता विधेची प्रार्थना करू लागते. हितबुद्धीने पतिव्रता स्त्री शरीर- नाशक पतिसहगमन कशी करिते, हे प्रसिद्धच आहे. अस्त्र अस्त्राने शात होते; मळ मला (क्षारा) ने नाश पावतो; विष विषाने शमते व शत्रला शत्रु मारतो. त्याचप्रमाणे अविद्यारूप विद्याच अविद्येला मारते. सारांश रामा, अविद्या ही अशा प्रकारची आहे. ती आपल्या नाशाने हर्ष देते. हिचा स्वभाव कळत नाही. ही पहाता पहाता नाहीशी होते. ही विवेकाला आच्छादित करते. विविध जगास उत्पन्न करते. ही कोण आहे हेही कळत नाही. तस्मात् हे जग म्हणजे महा आश्चर्य आहे. तिच्याकडे पाहिलेच नाही म्हणजे ही स्फुरण पावते व पाहिले म्हणजे लागलीच नाश पावते. ह्या मायेला जर ओळखले नाही तर ती प्रमाण- रूपच म्हणजे सत्यच होऊन बसते. खरोखर ससारबध उत्पन्न करणारी ही माया अति विचित्र आहे. ही अक्षरामक माया अति अभिन्न पदामध्ये (म्हणजे एका आत्म्याचे ठायीं) हे क्षर जगत् पसरते. त्यामुळेच क्षर व अक्षर या पुरुषाहून भिन्न असलेला हा आत्मा पुरुषोत्तम होय. आचार्य, श्रुति, तर्क, स्वानुभव व अभ्यास याच्या योगाने दीप्त झालेल्या 'माया वस्तुतः नाही' या भावनेने तूं तत्त्ववित् झालास व तुला ज्ञेयप्राप्ति झाली म्हणजे तिचा आशय तुला कळेल. पण जोपर्यंत तुला तस्वसाक्षात्कार झालेला नाही तोपर्यंत माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवूनच-अविद्या नाही, ती मिथ्या आहे-असा तूं दृढ निश्चय कर. मनोमात्र असलेले हे सर्व दृश्य