पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ११. ५९५ दुसरी कल्पनाच नसल्यामुळे या (पूर्वोक्त) उक्ती खन्या कशा असणार ? अर्थात् त्या व्यावहारिक आहेत. शब्द, त्याचा अर्थ, विचार इत्यादि सर्व परमात्ममय आहे. एका अग्नीपासून झालेला दुसरा अग्नि वस्तुतः भिन्न नसतो. पण हा याचा जनक व हा याच्यापासून झालेला अशी व्याव- हारिक भेदकल्पना होते की नाही? त्याचप्रमाणे परमात्मा कारण व जग कार्य इत्यादि म्हणणे हा शुद्ध व्यवहार आहे. ज्याला बोध करावयाचा त्याच्या ज्ञानाकरिता ही मिथ्या वचनें आम्ही योजतो. परमात्मतत्व एक व अनंत आहे. तेव्हा ते कोणाला कसे उत्पन्न करणार ? वाणी नेहमी सापेक्ष असते (म्ह. एकाच्या अपेक्षेन दोन हा शब्द प्रवृत्त होतो व स्वतः एकही दोन, तीन इत्यादिकाच्या अपेक्षेने प्रवत्त झालेला असतो.) ती व्यवहाराच्याच मात्र उपयोगी आहे. परम पुरुषाथोच्या साक्षात् उपयोगी नाही. कारण परम पुरुषार्थरूप ब्रह्म स्वतः निर्विषय आहे. यास्तव सूक्ष्माच्या अपेक्षेने प्रवृत्त झालेल्या ब्रह्म (म. अति अति मोठे) या शब्दाच्या योगाने आत्मतत्त्वाची नुस्ती कल्पना करून तत्त्वाचा साक्षात् अनुभव समाधि-अवस्थेत जाऊनच घ्यावा लागतो. पण ती अवस्था प्रयत्नसाध्य आहे. दीर्घ प्रयत्नाने तिचा लाभ होतो. यास्तव तिच्या- विषयी रुचि उत्पन्न होऊन मानवाने प्रयत्नही करावा म्हणून आम्ही असल्या मिथ्या (कल्पित) वचनाचाही उपयोग करून शिष्याच्या परम हिताकरिता उपदेश करितो. यास्तव रामा, हे सर्व ब्रह्मच आहे, अशी तूं आपली भावना दृढ कर. सर्वत्र त्याचे दर्शन घे. स्थूल दृष्टीने जरी तुला घटपटादि अनेक वस्तू दिसल्या तरी विवेक-दृष्टीने तुला त्याचा साक्षात् अनुभव येणे शक्य आहे. बाबारे, सर्व चित्ताच्या अधीन आहे. रित संसार आहे व तेच मोक्षपद आहे. विवेकाने त्याला शात कर. चित्त शात व अति निर्मल झाले म्हणजे तू स्वतःच ते सत्य पद होशील ४०. सर्ग ४१-सर्व ससाराचे बीज माया आहे व ती अनिर्वचनीय आहे. श्रीराम-गुरुवर्य, आपल्या या गभीर उपदेशाच्या योगाने माझ्या मनाची स्थिति काही चमत्कारिक होत. क्षणात मोह गेला आहे असे वाटते व क्षणात तो पुनः बुद्धीला बुचकळ्यांत पाडतो. अनंत, अप्रमेय, सर्व, एक, स्वयंप्रकाश व नित्य अशा ब्रह्माला अहभावच कसा व कां आला ? ते मला सांगा.