पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ स्थितिप्रकरण-सर्ग ४० ५९३ तूं इतकेच जाण की, ब्रह्म सर्वशक्ति, सर्वव्यापि, सर्वगत असून मीच सर्व आहे. गारुडी मायेनें विचित्र वस्तू कशा उत्पन्न करतो ते तुला ठाऊक आहेच. तो पहाता पहातां विद्यमान वस्तु नाहीशी करितो आणि अविद्यमान वस्तु उत्पन्न करून दाखवितो. त्याप्रमाणे आत्मा वस्तुतः मायामय नसतानाही लौकिक अथवा अलौकिक मायाव्याप्रमाणे या जगांत नानाप्रकार करून दाखवितो. तो भव्यक्त असतानाही विचित्रतेस प्राप्त होऊन आपल्याला प्रकट करतो. त्याच्या सत्तेने सर्व सत्तायुक्त होते. याप्रमाण एकच वस्तु हे सर्व होत असल्याकारणानें, असें कसे होईल, असें म्हणणे किवा हर्ष, क्रोध, विस्मय करणे युक्त नव्हे. सदा समता व संतोष धारण करावा. समबुद्धि ज्ञानी विस्मय, हर्प इत्यादि विकारयुक्त होत नाही. पण आत्मा जगातील कोणत्याही पदार्थास स्वप्रयत्नाने उत्पन्न करीत नाही किंवा त्याचा नाशही प्रयत्नपूर्वक करीत नाही. तर समुद्रां- तील तरंग, दुधातील घृत, मातींतील घट, तंतेतील वस्त्र व वट-बीजातील वट याप्रमाणे आत्म्यामध्ये असलेल्या शक्ती अनुकूल कारण झाले असता आपाआप व्यक्त होतात व तीच जगाची उत्पत्ति होय. पण त्याचा कर्ता अथवा भोक्ता कोणी नाही. अथवा त्याचा अत्यत नाशही कधी होत नाही. केवल आत्मतत्त्व साक्षी, निरामय व समस्वरूपानें स्थित असतानाच हे सर्व होते. दिवा असला की, रात्री त्याचा प्रकाश आपोआप पडतो, सूर्य असला की, दिवस आपोआप होतो व पुष्प असले की, वास आपोआप येतो, त्याप्रमाणे आत्मसत्तेने हे जगत् आपोआप होते. ते आभासमात्र आहे. जगत्समयीही आत्मा निर्दोष असतो. यथार्थ ज्ञान झाले म्हणजे ब्रह्मापासून सर्व पदार्थाचा उद्भव कसा झाला ते कळते. असो, राघवा, काम-कर्म- वासनारूपी सहस्रावधि शाखांनी व विचित्र शुभाशुभ फलानी भरलेला हा महा भयंकर ससारवृक्ष आत्म्याच्या अज्ञानामुळे दृढमूळ झाला आहे. यास्तव आत्म्याचा जणु काय खोडाच अशा या विशाल वृक्षाला विवेकरूपी खड्गानें तोडून टाकून तूं स्वस्थ व मुक्त हो ३९. सम -उपाधींमुळे जीव भिन्न भिन्न होतात. जीव व त्याच्या सर्व उपाधी ब्रह्ममय आहेत. श्रीवसिष्ठ-शूर रामा, ब्रह्मापासूनच या सर्व विचित्र भूतजाती कशा उत्पन्न होतात, त्याच्यामुळेच त्या नाश कशा पावतात, मुक्त कशा होतात,