पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५९२ बृहद्योगवासिष्ठसार. धान्य. अथवा निर्विकार ब्रह्मापासून झालेले हे जगही निर्विकार असले पाहिजे. बरे, हे चिदात्म्याहून भिन्न आहे असे समजावें तर निष्कलंक परमेश्वर जगद्रूप होतो असे म्हणणे म्हणजे त्याला कलक लावणे आहे, असें होतें. श्रीवसिष्ठ-रामा, आपल्याला दिसत असलेले हे सर्व ब्रह्मच स्थिर आहे. त्याच्यामध्ये मलाचा गधही नाही. समुद्रामध्ये जलच तरगाच्या भोघाने स्फुरण पावत असते, धूळ नव्हे. रघुनाथा, अग्नीमध्ये उष्णते- वाचून जशी दुसरी कल्पना नाही त्याप्रमाणे जगात केवळ ब्रह्मावाचन निराळी कल्पनाच नाही. श्रीराम-महाराज, आपले हे वचन अस्पष्टार्थ आहे. हे दुःखमय जग निर्दुःख व निर्द्वन्द्व ब्रह्मापासून झालेले कसे ? श्रीवाल्मीकि-याप्रमाणे रामाने वसिष्ठांना निरुत्तर केले असता, याला आता कोणत्या उपायाने उपदेश करावा, म्हणून ते मुनिश्रेष्ठ विचार करू लागले.-याची बुद्धि अद्यापि चागलीशी विकसित झालेली नाही. थोडी- शीच निर्मल झाली आहे. त्यामुळे त्याला असे सदेह येतात. यास्तव आप- ल्याला अजून याला उपदेश केला पाहिजे. कारण ज्याच्या मनाला चागला विद्यासंस्कार झालेला असतो त्या ज्ञेय-पदार्थास जाणणा-या, व विवेकतः मोक्षोपाय सागणान्या वाणीच्या पार गेलेल्या बुद्धिमानाला तत्त्वज्ञानामध्ये विरोध भासत नाही. यास्तव याच्या चित्त-विश्रातीकरिता मला आधी यक्तीने उपदेशच केला पाहिजे. अर्धव्यत्पन्न पुरुषाला हे सर्व ब्रह्मच आहे, असा उपदेश करणे उचित नव्हे. कारण भोगदृष्टीने व्याकुळ झालेल्या त्याला त्यामुळे तत्त्वबोध होत नाही. श्रेष्ठदृष्टि प्राप्त झालेल्या पुरुषाची भोगदृष्टि क्षीण होते आणि ती चागली क्षीण झाली म्हणजे सागितलेन्टा सिद्धात मनात चागला टमतो. याम्नव प्रथमतः शम- दमादि गुणाचा उपदेश करून शिष्याची वृद्धि शुद्ध झाली म्हणजे मग हें सर्व ब्रह्म अमून शुद्ध तूंही तेच आहेम, अमें मागितले पाहिजे. अर्द्रप्र बुद्धाला 'हे सर्व ब्रह्म आहे' असें जो सागतो तो त्याला नरकातच लोटतो. शिष्याची योग्यता न जाणतां उपदेश करणे यासारखे महापाप नाही. असा बराच विचार करून श्रीवसिष्ठ म्हणतात-रामा, ब्रह्माच्य ठिकाणी कलंकलेश आहे की नाही हे तुला पुढे आपोआप कळेल. तू