पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ३९. सिद्ध व वादिसिद्ध द्वित्व, एकत्व, सत्त्व असत्त्व, इत्यादि व्यावहारिक भावांना तात्कालिक महत्त्व देऊन तेवढ्यापुरताच व्यवहार करतो. पण तो करीत असतांनाही पदार्थांच्या अनेक शक्तिसमूहाहून भिन्न नसलेली परमात्म्याची सर्वशक्तिता व्यक्त करितो. रामा, अज्ञानामुळे हे दुःख उद्भवतें व ज्ञानानें तें लीन होते. साराश राघवा, या जगात मोक्षबुद्धि व बंधनबुद्धि व्यर्थ कल्पिलेली आहे. यास्तव तू सर्व कल्पना सोडून, निरहंकार व आत्मनिष्ठ होऊन निश्चित बुद्धीने व्यवहार करीत भूलोकीं रहा ३८. सर्ग ३९-ब्रह्माचें सर्वशक्तित्व, रामाचा मोह, त्याच्या बोधाकरिता वसिष्ठांचा विचार व बोध. श्रीराम-भगवन् , सर्व जर ब्रह्मच आहे व बंध-मोक्षादि दुसरें काही नाही, तर आधाररहित चित्राप्रमाणे ह्या सृष्टीचा उद्भव कसा झाला! श्रीवसिष्ठ-राजपुत्रा, ब्रह्मतत्व या सर्व सृष्टीच्या रूपाने विवर्त पावते. ते सर्वशक्ति असल्यामुळे पदार्थाच्या सर्व शक्ति त्याच्यामध्ये असतात, असें अनुमान करिता येतं. सत्त्व, असत्त्व, द्वित्व, एकत्व, आद्यत्व, अंतत्व इत्यादि सर्व त्याच्या विचित्र स्वरूपात राहू शकते. ज्याप्रमाणे चद्रोदयामुळे उद्भवणारा समुद्राचा पूर तरगाच्या नृत्याने नाना-आकारता दाखवीत प्रकट होतो त्याप्रमाणे चिद्धन परमात्मा चित्त व कर्ममय, वासनामय, आणि मनो- मय शक्ती धारण करतो. त्याना फलोन्मुख करून दाखवितो व पुनः आपल्याच स्वरूपात लीन करतो. तात्पर्य सर्व जीव, सर्व सृष्टी व सर्व पदार्थ याची उत्पत्ति सतत ब्रह्मापासून होते. तरग सागरापासून उत्पन्न होऊन त्यांतच जसे लीन होतात त्याप्रमाणे सर्व भाव परमात्म्यापासून प्रकट होऊन त्यातच लीन होतात. अर्थात् ते सर्व तन्मय असतात. श्रीराम-भगवन् , ही तुमची वचनव्यक्ति (भाषा, बोली ) मला कळत नाही. ती फार गहन आहे. मनासह पाच ज्ञानेंद्रियास ज्याचें ज्ञान होत नाही (जें त्यांचा विषय नव्हे ) असें ब्रह्म को व त्याच्यापासून झालेली ही भंगुर पदार्थश्री कोठे ! त्यातूनही हा सृष्टीचा प्रारंभ ब्रह्मापा- सूनच होतो असें जर म्हटले तर तीही त्याच्याच स्वभावाची व त्याच्याच सारखी व्हावयास पाहिजे होती. कारण जो पदार्थ ज्या कारणापासून होतो तो त्याच्यासारखा असतो. जसा एका दिव्यापासून झालेला दुसरा दिवा, एका पुरुषापासून झालेला दुसरा पुरुष व एका धान्यापासून झालेले दुसरे