पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९.० बृहद्योगवासिष्ठसार. असल्यामुळे ज्ञानी कर्म करीत असतानाही अकर्ता होतो. त्याचे चित्त कर्म- समयीं ' अहं कर्ता' या दुर्भावनेनें लिप्त होत नाही. यास्तव तो हस्तपाद- विक्षेप ( . हातापार्याची हालचाल ) एतद्रूप कर्म मोठ्या यत्नाने जरी करीत असला तरी त्याचे फळ भोगीत नाही. याप्रमाणे मनच सर्व कर्माचें सर्व इच्छाचे, सर्व सुख-दुःखादि भावाचे, सर्व लोकाचे व सर्व गतीचे बीज आहे. यास्तव त्याचा परिहार केला असतां सर्व कर्माचा परिहार केल्यासारखा होतो. सर्व दुःखें क्षय पावतात व प्रारब्धादि कर्माचाही लय होतो. ज्ञानी मानस कर्मानेंही पराभूत होत नाही. ती त्याला परतंत्र करीत नाहीत व तो त्याच्या फलामध्येही अनुरक्त होत नाही. कारण ती कमें आत्म्याहून भिन्न आहेत, असे त्याला वाटतच नाही. ज्याप्रमाणे एकादा बालक मनाने एकाद्या नगरास निर्माण करतो व त्याला पताका, घज, इत्यादिकानी भूषित करतो. पण तें मनःकल्पित असल्यामुळे खोटें समजतो. काही वेळ चित्ताचा विनोद झाल्यावर विस्मरणाच्या योगाने तो त्याचा नाश करून सोडतो. पण त्यामळे 'अरे अरे, माझे नगर नष्ट झाले' असे म्हणन त्याच्या करिता रडत नाही. अथवा लीलेने 'अरेरे माझें कृत्रिम नगर नष्ट झाले आता मी काय करू ? हाय हाय' असे म्हणून तो जरी रडण्याचे अनुकरण करीत असला तरी खरोखर दुःखी होत नाही त्याप्रमाणे ज्ञानी परमार्थतः कर्मादिकाचे अनुकरण करीत असला तरी, आसक्तीच्या अभावी, त्यामुळे लिप्त होत नाही. या जगात दुःखाचें कारण काय आहे ? काही नाही, कारण आत्म्याहून भिन्न पदार्थच नस- ल्यामुळे सर्व अविनाशि आहे. तेव्हां नाशप्रयुक्त दुःख कसे होणार ! आत्मा तत्त्वतः अकर्ता व त्यामुळेच अभोक्ता आहे. पण तत्त्वज्ञानाच्या अभावी अनुभवास येणारे कर्तृत्व निव्वळ आरोप आहे. आवश्यक कर्मही वस्तुतः आत्मसबंधी नव्हे. अनुकूल व प्रतिकूल विषयाविषयी क्रमाने अभिलाष व द्वेष होणे हे सुद्धा विषयाकडे विषयदृष्टीने पहाणान्या पुरुषाचे ठायींच संभवते. सर्व आत्मा आहे असे पहाणान्या पुरुषाचे ठायीं राग-द्वेष संभवत नाहीत. पूर्ण आत्म्यामध्ये ज्याचें मन आसक्त असते त्याच्या दृष्टीने संसारांत मोक्षही नसतो. पण मजून अभ्यास-दशेत असल्यामुळे ज्याचे मन आत्मरूप झालेले नसते त्यांच्या दृष्टीने बंध-मोक्षादि सर्व माहे. ज्ञान्याला जसे आहे तसेंच हें केवल भारमतत्त्व भासते. तो लोक