पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ बृहद्योगवासिष्ठसार. या इतर पदार्याप्रमाणे आमन्या पुढे बसला आहे, असे आह्मान वाटते. पण त्याचा अतर्गत अभिप्राय अगदी निराळा आहे मी देहरहित आहे, हा त्याचा निश्रय कोणत्याही अवस्थेत ढळत नाही. मग त्याच्यामध्ये व विदेहमुक्त शुकामव्ये अतर कोणते राहिले ? ते दोवेही बोध- म्वरूप आहेत वायु मोठयाने वाहत असो की अगटी मा चालो, तो जसा नेहमी वायच असतो त्याप्रमाणे हे दो मुक्तच आहेत एकाचे प्रारब्ध कर्म सपन्यामुळे नो विदेह मुक्त झाला व दुसऱ्याचे न संपल्यामुळे तो सदेह मुक्त झाला. ___ असो, रामा, आता मी तुला मुख्य गोष्ट लागतो ती तू एकाग्र- मनाने ऐक या ससारात कोणत्याही पुरुषान कोणतीही गोष्ट नि. श्चयाने केलेल्या पुरुपार्थान्या योगाने प्राप्त होते. आपला इष्ट मनोरय साध्य करून घेण्याकरिता सतत प्रयत्न करणे अति अवश्य आहे. शास्त्राने ज्याचे विधान केले आहे अशी शारीरिक. वाचिक व मानसिक कर्मे केल्याने चित्तशुद्धि हे फळ मिळते चित्तशुद्धीच्या द्वारा आत्म्याचा साक्षात्कार होतो आत्मसाक्षात्कार झाला असता हृदयात आलाद उद्भवतो. काम-क्रोधादि सत्ताप देणाऱ्या दोपाचा नाश झाला असता चित्तात परमानद होणे ही काही अशक्य गोष्ट नव्हे. या परम-आह्ना- दासच जीवन्मुक्तिमुख ह्मणतात. पण ते मि.से केवल प्रयत्नाधीन आहे. यास्तव प्रयत्नावरच सर्व भार टाकिट' पाहिज.-दैव अनुकूल नसल्यास प्रयत्न व्यर्थ होतो, असे आपण नेहमी पहातो, व " चागल्या कामात विघ्ने फार" असे व्यवहारातही मणतात. तेव्हा नुस्त्या प्रयत्नाने काय होणार ?-असे कदाचित् तृ ह्मणशील, पण विचार करून पाहि- ल्यावर तुझ्या ध्यानात येईल की, हे ह्मणणे बरोबर नाही कारण प्राण्याची कोणतीही क्रिया प्रयत्नावाचून होत नाही, व आपला कोणताही मनोरथ सिद्ध करून घ्यावयाचा झाल्यास तो कोणालाही न विचारिता स्वाभा- विकपणेच प्रयत्न करू लागतो. इष्ट प्राप्तीकरिता देवावर हवाला ठेवून कोणी वसत नाही देव जर इष्टप्राप्तीचे गरोखरच साधन असते तर या अनत प्राण्यातील एकाद्याने तरी त्याच्या दाग आपले साध्य सिद्ध केले असते. पण दैवाच्या विश्वासावर रहाणारे निःसीम दैववादीही भोजनादिकाकरिता प्रयत्न करीत असतात. तेव्हा दैव ही एक मूखांची