पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ स्थितिप्रकरण-सर्ग ३८. ५८९ कर्माविषयींचा मानस संकल्प करोत, त्यांची कर्तृता सिद्ध आहे. पण तत्त्वज्ञानी पुरुष वासनाशून्य असल्यामुळे सदा अकर्ता असतो. कारण तत्त्वज्ञाची वासना शिथिल झालेली असते. त्यामुळे तो शरीराने कर्म करीत असला तरी फलाची इच्छा करीत नाही. असक्तबुद्धि राइन नुस्ते स्पंदन करतो. प्राप्त फलही आत्मरूप आहे असें जाणतो. पण अज्ञाचे चित्त भोगामध्ये आसक्त असल्यामुळे तो साक्षात् कर्म करीत नसला तरी कर्ता आहे. मन जे करते तेच कर्म होते व तें में करीत नाहीं तें कर्म नव्हे. यास्तव मनच कर्ता आहे, देह नव्हे. चित्तामुळेच हा संसार आला आहे. तो चित्तमय आहे. चित्तातच स्थित आहे, असे जाणणे हे ज्ञान, त्यामुळे विषय-वृत्ती शात होतात. पण इतकें होऊनहीं वासना लीन झालेल्या नसल्यास तो अज्ञ जीवच रहातो. आत्मज्ञाचे मन, पाऊस पडू लागला असता मृगजळाप्रमाणे अथवा प्रखर उन्हातील बर्फाच्या तुकड्याप्रमाणे, अत्यंत लीन होऊन जाते व ते आत्मरूप होऊन रहाते. नंतर त्याचे वर्णन करिता येत नाही. तत्त्वज्ञ पुरुप वासनामय स्पंदरसामध्ये बुडून जात नाही. पण मूर्खाचे मन भोगभूमीलाच पहाते. सत्-तत्त्वाला पहात नाही. याविषयी एक दृष्टात देतो. एक पुरुष शय्येवर किंवा आसनावर बसलेला आहे; खळग्यात पडत नाही, पण तो खळग्यात पडण्याच्या वासनेने वासित झालेल्या चित्तात खड्डयात पडण्याचे दुःख अनुभवितो. दुसरा पुरुष खळग्यात पडत आहे. पण शात चित्तात तो शय्या व आसन यावर स्वस्थपणे बसल्याचा अनुभव घेतो. याप्रमाणे या दोघापैकी एक खळग्यात पडण या क्रियेचा अकर्ता असूनही संकल्पवशात् कर्ता होतो व दुसरा कर्ता असूनही अकर्ता होतो. तस्मात् पुरुष चित्तमय होतो, हा सिद्धात होय. यास्तव चित्त सदा अससक्त र हूं द्यावे. ज्यामध्ये संसक्ति करावयाची ते आत्मव्यतिरिक्त नाही. जगातील सर्व काही शुद्ध चित्-तत्त्व आहे. आत्मा सुखदुःखाचा विषय नाही, आधार व आधेय-दृष्ट आत्म्याहून भिन्न नाहीत, मी अकर्ता, अभोक्ता, सर्व पदार्थाहून विलक्षण व अति सूक्ष्म आहे, जे काही दिसतें तें सर्व मीच आहे व सर्वावभासक मीच आहे, असा निश्चय झाला असता चित्तवृत्ति चिताशून्य होते व ती व्यवहारामध्ये सहज लीलेने रहाते. त्यामुळे संकटसमयींही अशा ज्ञान्याला दुःखाचा अनुभव येत नाही. तर आनंदाचाच अनुभव येतो. चित्त संकल्पशून्य