पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८८ वृहद्योगवासिष्ठसार. करीत नाहीत. आधार व आधेय यांचे ऐक्य असल्यामुळे तो कोठेही मर्यादित होऊन रहात नाही. इच्छा नाहीशी झाली म्हणजे द्वैत-कल्पनाच क्षीण झाल्यामुळे नैष्कर्म्यही इष्ट वाटत नाही. रामा, हीच ब्रह्मस्थिति आहे. तूं याहून भिन्न कल्पना करूं नकोस. पण तशी भिन्न कल्पना जर होतच असेल तर तूं सर्व द्वंद्वरहित व संतापशून्य होऊन खुशाल कर्मकर्ता हो. मम तुझे मी निवारण करणार नाही. शिवाय हे रामभद्रा, मोठ्या वेगाने मी कर्ता आहे, असे समजून व वारंवार हे नाना- प्रकारचे कर्म करून तू शरीरगत भूताच्या पुष्टीस कारण होणाऱ्या विष- यावाचून दुसरे काय मिळविणार, तें साग पाहूं ? त्यापासून कोणतेही उचित फळ मिळणे शक्य नाही. यास्तष सर्व प्रकारचा कर्तृत्वाभिनिवेश टाकून तू स्वस्वरूपोचित अकतृत्वामध्यच आस्था टेव. कारण श्रुति व गुरु याच्या वचनानी तुला आत्मबोध झाला आहे. आता वातरहित सागराप्रमाणे तूं निश्चल, स्वस्थ व स्वच्छ हो. बाबारे, ज्याच्या योगाने अनत सुखाचा लाभ होऊन इच्छा पूर्ण होईल असें साधन, प्रत्येक दिशेच्या टोकापर्यत जरी भटकत गेले तरी, अति यत्नशील पुरुषालाही, प्राप्त होणे शक्य नाही, असा निश्चय करून, रामा, तू मनानेही बाह्य पदार्थाकडे जाऊ नकोस. तूं देहाने मर्यादित झालेला जीव नव्हेस. तर पूर्ण-आनंद-चिदात्मा आहेस ३७. सर्ग ३८-आत्मा असंग आहे असे न जाणणाराना मन संगामुळे कर्तृता प्राप्त होते. पण ज्ञानी मी कर्ता व भोक्ता नव्हे असं जाणतो त्यामुळे त्याला बंध नाही. श्रीवसिष्ठ--राघवा, तत्त्वज्ञ व अतत्त्वज्ञ याच्या कर्मामव्ये भेद आहे. एक कमें करीत असतानाही ही असत् आहेत व मी कर्ता नव्हे, असे जाणतो व दुसरा ती सत्य आहेत व मी कर्ता आहे असे समजतो. अर्थात् 'मी याचा कर्ता' अशा प्रकारची वासना हेच कर्तत्व होय त्यामुळेच चेष्टेप्रमाणे फळभोक्तृत्वही उद्भवते. वासनेप्रमाणे पुरुष चेष्टा करतो. व चेष्टेप्रमाणे फलभोग घेतो. अर्थात् फलभोक्तृत्व हा कर्तृत्वाचा परिणाम आहे. शारीर क्रिया होणे म्हणजे त्या क्रियेचा कतो होणे नव्हे, तर ही अमुक क्रिया मी अमक फलाकरिता करिती, असा संकल्प करून शरीराची चेष्टा ( हालचाल ) करणे हे कर्तृत्व आहे. कोणत्याही अवस्थेत मन वासनेप्रमाणे अनुभव घेते. यास्तव ज्यांना तत्त्वज्ञान झालेले नसते असे पुरुष शरीराने कर्म करोत किंवा नुस्ता