पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ३७. या लोकी जन्मद्वारा येते, मरून परलोकीं जाते, सर्वतः स्थावरादि जन्मांच्या योगाने रहाते, भोगांच्या इच्छेने अनेक ऐहिक व पारलौकिक विषयांचे उपार्जन करते व जन्म-नाशांच्या द्वारा या संसारांत धावते ३१. सर्ग ३७-आत्म्याचा हा अनात्मभाव अविद्या, काम व कर्म यांच्या योगाने उद्भवतो आणि ज्ञान, वैराग्य, नैष्कर्म्य यांच्या योगाने स्वरूपावस्थिति प्राप्त होते... श्रीवसिष्ठ-रामा, याप्रमाणे ब्रह्माच्या स्वभावापासून या सर्व अति स्थिर आकाराच्या जगत्पंक्ती सर्वतः उद्भवतात व लय पावतात. एकमेकास कारण होणान्या असंख्य वस्तूंनी भरलेले हे जग अधिष्ठान-चैतन्यापासून झाले आहे व एकमेकाच्या निमित्ताने नाश पावणारे त्यांतील पदार्थ अधिष्ठानांतच लीन होतात. अगाध जलाच्या मध्यभागी जलरहित प्रदेशच नसल्यामुळे तेथील जलस्पंदही जसा वस्तुत. अस्पद, त्याप्रमाणे असत् व सत अशी ही सर्व चित्च दिसत आहे. निराकार आकाशामध्ये सूर्यकिरणामुळे जसे मृगजळाचे प्रवाह दिसतात त्याप्रमाणेच या चित्- तत्त्वामध्ये सृष्टिकल्पना अनुभवास येतात. मदवशात् आपलेच स्वरूप मापल्याला जसे निराळेच दिसते, त्याप्रमाणे चित्त्वधर्मामुळे चिद्धातु जड सल्यासारखा भासतो. जगाचा अनिर्वचनीय स्वभाव आहे. त्याला सत्, असत् , स्थिर, अस्थिर, भिन्न, अभिन्न इत्यादि काहींच म्हणता येत नाही. हे रामा, ज्याच्या योगानें तू शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध जाणतोस तो आत्माच परब्रह्म असून सर्व व्यापून राहिला आहे. नानात्व व एकत्व यांचा ज्याला स्पर्शही नाही अशा अमल आत्म्याच्या ठायीं द्वितीय ही कल्पनाच कशी होणार ! सर्व सत्, असत्, शुभ, अशुभ इत्यादि सृष्टी वासनावशात् कल्पिलेल्या असल्यामुळे त्या सर्व मायिक आहेत. अथवा तत्त्वदृष्टया त्या सर्व आत्ममात्र आहेत. ही अमुक एक वस्तु आत्म्याहून निराळी आहे असे वाटले म्हणजे तिच्याविषयी इच्छा होते, हे युक्तच आहे. पण सर्व आत्माच आहे, त्याच्याहून भिन्न दुसरे काही नाही असे जेव्हा साक्षात् कळते तेव्हा ज्ञानी कशाच्या इन्छेने, कशाचे स्मरण करीत इतस्ततः धावणार ? अथवा धावून तरी त्याला मात्म्यावाचून काय मिळणार ? हे इष्ट आहे, हे अनिष्ट आहे, ह विकल्प आत्म्याला स्पर्श करीत नाहीत. यास्तव निरिच्छता बाणली म्हणजे कर्ता, करण व कर्म यांचे ऐक्य झाल्या कारणाने, ज्ञानी काही