पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ बृहद्योगवासिष्ठसार. कृत्रिम वेषामुळे ते आपल्या स्वतःसिद्ध अनंतस्वरूपास विसरून 'मी मनुष्य आहे.' इत्यादि भावाने जीवतेस प्राप्त होते. नंतर नानापणारूढ झाला म्हणजे आहे, नाहीं, ग्रहण करणे, इत्यादिकाच्या उपयोगी असलेला देहभाव स्थिर होतो व संसारप्रवाह निघतो. याप्रमाणे पुर्यष्टकावर आत्मभावाचा भारोप करून विहित व निषिद्ध कर्माच्या योगाने ते चैतन्य भोग्य जग करतें. पण वस्तुतः ते करीत नाही. तेंच भूमीतील बीजापासून अकुररूपाने वर येते. त्याला तेंच आकाशरूपानं अवकाश देते. स्पदरूप वायु त्याला घाल. वून वर काढतो. जलरूपानें तें चैतन्यच रस देते. पृथ्वीच्या रूपाने तेच त्या अकुराला दृढ करते. तेजामुळे त्याला रूप प्राप्त होते. याप्रमाणे जगा- तील सर्व कार्याना सर्व वस्तु आपापल्या स्वभावाप्रमाणे सहाय करितात. कालही वस्तुमात्रावर सतत उपकार करीत असतो. तो कोणाला क्षीण करतो, कोणाला उत्पन्न करतो, कोणाला वाढवितो, कोणाला अनुकूल होतो व कोणाला प्रतिकूल बनतो. पण हा सर्व चित्चा विलास आहे. चित्च स्वतः अनुग्राह्य व अनुग्राहकही आहे. ती पुष्पामध्ये सुगध, फळा- मध्ये रस व वृक्षामध्ये कठिण काष्ट होते. तिच्या योगानेच मुळातील सूक्ष्म रस फळामध्ये परिपक्क रस होतात, पानात शिरा होतात. व नानाप्रका- रच्या फुलांत नानाप्रकारचे रग होतात. चित वसत ऋतूच्या रूपानें नवीं पुष्पे, पल्लव इत्यादिकाच्या उत्पत्तीस सहाय करते. तिच्या सत्तेनेच ग्रीष्म- ऋतूंत सूर्यदाहाच्या योगाने सर्व संतप्त होते, वर्षासमयीं मेघांची क्रीडा चालते, शरत्समयी शेते पिकतात, हेमंतात दश दिशा धुंद होतात व शिशिरात पाणी गोठन बर्फ होते. कालरूपी चित् याप्रमाणे सृष्टिमर्यादेवर अनुग्रह करीत असते. तिच्या माहात्म्यानेच, नदीच्या तरगाच्या ओघाप्र- माणे, या मृष्टी लारेने चालल्या आहेत. नियतीच्या रूपानेही चित्च जगाच्या प्रलयापर्यंत स्थिर रहाते. चवदा भुवनात रहाणान्या चवदा प्रकारची -नानाआकार, नाना विहार व नाना रचना यानी युक्त असलेली-भूते ही चित्च पुनः पुनः होते व नाश पावते. पण जल नाहीसे झाले म्हणजे बुडबुड्यांची परंपरा जशी आपोआप क्षीण होते त्याप्रमाणे या कारणभूत चित्-ला ओळखले झणजे भूताची धारेसारखी सतत चालणारी जन्म-मरण- परंपरा तुटते. सारांश, रामभद्रा, याप्रमाणे ब्रह्मांडकोटि-लक्षण व प्राणि- कोटि-लक्षण अशी ही दुष्ट जनता, प्राक्तन वासनावशात् वेड्याप्रमाण