पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ३६. ५८ निरश चिद्भाव सर्वत्र असूनही दिसत नाही. रत्नातील प्रतिबिंबाप्रमाणे ही भाम्यांतील सृष्टि सत्यही नव्हे व असत्यही नव्हे. आकाशाच्या आधाराने रहाणान्या मेघाना आकाश जसे स्पर्श करीत नाही त्याप्रमाणे चैतन्याच्या आधाराने रहाणान्या चैतन्यस्थ सर्गाना परा चित् स्पर्श करीत नाही. जलाशी संयुक्त झालेले किरण स्पष्ट भासत नाहीत. पण तेच त्यात प्रतिबिंबित झाले असता स्पष्ट दिसतात. त्याप्रमाणेच पुर्यष्टकात्मक देहामध्ये मात्र चित् स्पष्ट दिसते इतरत्र दिसत नाही. ती वस्तुतः सर्वसकल्पशून्य, सर्वसज्ञारहित, व नित्य आहे. तीच विषरूप झाली आहे. ती आकाशाहून शतपट स्वच्छ व शतपट सूक्ष्म आहे. विद्वानाच्या ठायीं ती निष्कलरूपिणी ( कलाशून्य ) असते. समुद्रातील तरंगाप्रमाणे चित्सागरातील ही त्वत्ता-मत्ता-मयी नानाता चिन्मात्रसत्तेहून भिन्न नाही. चित्-मुळे विषयस्फुरण होते, हे जर खरे आहे तर विषयाचे खरे स्वरूप अथवा त्याना सत्ता देणारी चित्च आहे, असे समजण्यास कोणती अडचण आहे ? पण अज्ञ पुरुष या परमार्थ दृष्टीचा 'आश्रय न करिता चित् निराळी व चेत्य ( विषय ) निराळे असे समजतो. त्यामुळे अज्ञामध्ये असलेली चित् असत्स्वभाव असल्याप्रमाणे होऊन उप ससार समूहाचे बीज धारण करते. पण तीच ज्ञानी पुरुषाचे ठायीं प्रकाशात्मिका व सकल-एक-रूपा होऊन रहाते. तिच्या अनुभवस्वभावामुळेच सूर्यादिकाचे ज्ञान होते. तीच सर्वभूताच्या विषयस्वादाचे निमित्त आहे. तीच सर्व जीवाच्या जन्मादिकाचे कारण आहे ती स्थूल व सूक्ष्मशरीराहून भिन्न असल्यामुळे वस्तुतः कधी उदय पावत नाही, कधी अस्त पावत नाही, कधी उठत नाही, बसत नाही, येत नाही, जात नाही. ती येथे आहे असेंही नाही व नाही असेंही नाही. तर ही चित् निर्मलाकार व आत्मस्वरूपात स्थित आहे. तेज:पुजापासून जसे तेज किवा जलपरातून जसे जल शतधा बाहेर पसरूं लागते त्याप्रमाणे या चित्-पासून शतशः सर्गसंभ्रम उद्भवतात. स्वतः शुद्ध अशाही चैतन्याचे अविद्येमळे सर्गसंभ्रमानी स्फुरण होणे हेच सर्गकर्तृत्व आहे व त्या कारणानेच एक शुद्ध व दुसरे औपाधिक अशी त्याची दोन रूपें मानलेली आहेत. ती कशी तें सागतो- ते स्वभावाने चित् व व्यवहारतः सर्वग आहे. परमार्थतः प्रकाश व मी स्वतःला जाणत नाही, असा व्यवहार होत असल्यामुळे, अप्रकाश आणि वस्तुतः निरंश व व्यवहारतः साश आहे. अविद्युत प्रतिबिंबित होणे या