पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८४ बृहद्योगवासिष्ठसार. तरंग निराळा असें जाणणे ही अज्ञता व जलच तरंग आहे असे समजणे ही ज्ञता आहे. नानात्व असत् असल्यामुळे तें दुःख, जन्म, मरण इत्यादिकाचे अनुसरण करते. म्हणून ते त्याज्य व आत्मतत्त्व दुःखादिकांनी रहित असते, म्हणून ग्राह्य होय. मन असत् असल्यामुळे त्याचा जरी विनाश झाला तरी दुःख होत नाही. कारण मृगजळाचा नाश झाल्यास त्याबद्दल शोक काय करावयाचा आहे ! ज्याच्यावर प्रेम नसते अशा बंधूविषयीही जसा एकादा व्यवहारी पुरुष उदासीन असतो त्याप्रमाणे रामा, तं या देहपंजराविषयी उदासीन रहा. स्नेहशून्य बंधूच्या सुख-दुखांनी परुष जसा सुखी व दुखी होत नाही त्याप्रमाणे भृतांचा सघ अशा या देहाच्या सुखदुःखानी तु मुखी-दुःखी होऊ नकोस. दृक्-रूप ज्ञान अनादि व शिवरूप आहे. वारा बद झाला असता धूळ जशी भूमीवर शात होऊन रहाते त्याप्रमाणे सकल्प-विकल्प-वायु शात झाला अमता मनरूपी धूळ सत्य शिवरूप आत्म्यामध्ये शात होऊन रहाते. मनोरूपी वायु शात झाला असता देहरूपी चूळही उडेनाशी होते व त्यामुळे ससारनगरांत सूर्यप्रकाशास प्रतिबंध करणारे दुर्दिन कधीही होत नाही. वासना, जाड्य, तृष्णा, मनोरथ, इद्रियविलास, मिथ्याज्ञान व मोह याचा क्षय झाला असता अज्ञान पार कोटें निघून जाते. देहरूपी पर्वतावरून भयरूपी क्षुद्र नद्या वहात नाहीत. शरद्-ऋतूंतील आकाशाप्रमाणे चिदाकाश स्वच्छ होते. ज्याचा महा-उदय झाला आहे असा जीव-सूर्य स्वच्छ तळपू लागतो आणि सात्त्विक आशारूपी महा दिशा शोभू लागतात. सागा रामभद्रा, परम आनंद देणारा आत्मप्रकाश प्राप्त झाला असतां विवेक अति पवित्र व सफल होतो. सर्व त्रिभुवन अति स्वच्छ व शीतल होते. विस्तृत हृन्मरोवर अति निर्मळ होते आणि त्यातील अहकाररूपी महा प्राह कोटं नाहीमा होतो. सर्व सदेहशून्य, सर्वगामी, सर्वनायक, वासना- रहित व शातचित्त ज्ञानी स्वदेहरूपी नगराचा ईश्वर होतो ३५. सर्ग ३६-स्वभावतःच असक्त चिन् सर्वत्र स्थित आहे व तिच्या स्थितीनेच सर्व भाषांची स्थिति होते. श्रीवसिष्ठ--रामा, पुढे उत्पन्न होणाऱ्या भव्यक्त लाटा जलामध्ये जशा स्थित असतात त्याप्रमाणे सर्व सृष्टी चित्-तत्त्वांत असतात पण आकाश सर्वगामी असूनही सूक्ष्मत्वामुळे जसे साक्षात् अनुभवास येत नाही त्याप्रमाणे